Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: काँग्रेसकडून आज मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. यावेळी विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहे. राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
पहिल्या नवऱ्याने मित्रा सोबत मिळून काढला पत्नीचा काटा; पतीच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील कुडतुडी आदिवासीवाडी येथे एक महिला घरी कपडे धूत असताना तिच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना समोर आली आहे.हा हल्ला दुसरा तिसरा कोणी केला नसून तिच्याच पहिल्या नवऱ्याने आपल्या मित्राला सोबत घेऊन केला आहे.या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचाराकरिता म्हसळा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आली आहे.या हल्ल्यात तिच्या डोक्यावर व हातावर लाकडाने तसेच मानेवर स्क्रू ड्रायव्हर च्या सहाय्याने वार करण्यात आले आहेत. याविरोधात या दोन्ही आरोपींवर म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्वेश धाडवे अस या आरोपीचं नाव असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
महिला दिनाच्या दिवशी महिलांचा जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा
महिला दिनाच्या दिवशी महिलांचा जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा
मार्च महिन्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणी टंचाई जाणवत आल्यानं इगतपुरी त्रंबकेश्वर तालुक्यातील गावामध्ये राहणाऱ्या महिलांचा मोर्चा
एकीकड महिला दिनाचे कार्यक्रम होत असताना दुसरीकडे महिलाच मोर्चा























