Shani Dev: 29 मार्चला शनिदेवांचा न्याय होणार! 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू, तर काहींना कर्माचं फळ मिळणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शनीचे संक्रमण काही राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहे. काहींचा गोल्डन टाईम सुरू, तर काहींना कर्माचं फळ मिळणार, जाणून घ्या

Shani Dev: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना खूप महत्त्व देण्यात आले आहे. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे आणि कलियुगातील दंडाधिकारी मानले जातात. नऊ ग्रहांपैकी शनीला न्यायाधीशाचे स्थान आहे. शनि ग्रहाबाबत आपल्या समाजात अनेक समजुती आहेत. शनिचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. शनीची दशा साडेसात वर्षे असते, यालाच शनीची साडेसाती म्हणतात. जे लोक चांगले कर्म करतात, त्यांना शनि शुभ फळ देतो, तर वाईट कर्म करणाऱ्या लोकांवर वाईट नजर टाकतो. शनीच्या वाईट नजरेमुळे त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येऊ लागतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि उच्च स्थानावर असेल तर तो त्याला गरीबातून राजा बनवतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या कुंभ राशीत स्थित आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत शनीचे संक्रमण काही राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 'या' राशींचा गोल्डन टाईम, तर काहींना कर्माचं फळ मिळणार
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि मकर आणि कुंभ राशींचे स्वामी आहेत. शनीचा वेग सर्वात कमी आहे, शनि 29 मार्च 2025 रोजी रात्री 9:30 वाजता गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत शनीच्या संक्रमणामुळे काही राशींवरील साडेसाती आणि ढैय्या संपतील, तर काही राशींमध्ये ते सुरू होईल. 29 मार्च 2025 रोजी शनि 30 वर्षांनंतर पुन्हा मीन राशीत प्रवेश करेल. परिणामी मेष राशीवर साडेसाती सुरू होईल, तर कुंभ आणि मीन राशीवर त्याचा प्रभाव कायम राहील. कुंभ राशीच्या लोकांसाठी तिसरा टप्पा सुरू होईल आणि मीन राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा सुरू होईल.
कोणत्या राशीवरील ढैय्याचा प्रभाव संपेल?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या संक्रमणामुळे वृश्चिक आणि कर्क राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव संपेल. या दोन्ही राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय प्रगती करतील.
उपाय
- दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ आणि तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा.
- संध्याकाळी तिळाच्या तेलाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
- चांदीमध्ये नीलम रत्न बनवून शनिवारी उजव्या हाताच्या मधल्या बोटात धारण करा.
- शनि मंत्राचा जप करा.
- 8 नंबर असलेली चप्पल दान करा.
हेही वाचा>>
Moon Transit 2025: आज रविवारची रात्र 'या' 3 राशींचं नशीब चमकवणारी! चंद्राचा शनीच्या नक्षत्रात प्रवेश, राजासारखं जगाल, धनलाभ, संपत्तीत वाढ
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















