Mumbai -Goaमहामार्ग सुरळीत होण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता : ABP Majha
मुंबई गोवा महामार्ग सुरळीत होण्यासाठी आणखीन पाच ते सहा तासांचा अवधी लागू शकतो. लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर गॅस वाहक टँकर नदीत कोसळला असल्याने काल दुपारी तीन वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक बंद आहे. सकाळी सात वाजता भारत पेट्रोलियम कंपनीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी पलटी झालेला टँकर आणि एकंदरीत होत असलेली गॅस गळती याचा अंदाज घेतला. त्यानंतर आता क्रेन मागवली जाणार असून अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी हा अंदाजे तीन तासांचा आहे. पण क्रेन घटनास्थळी पोहोचणं आणि त्यानंतर मार्ग सुरळीत होणं यासाठी किमान पाच ते सहा तास किंवा त्यापेक्षा देखील जास्त कालावधी लागू शकतो.























