Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात लक्षवेधी घोषणा कुठली, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल कर्जमाफीची घोषणा. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात २ लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र या कर्जमाफीची रक्कम फारच त्रोटक असल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केलीय. शिवाय ही कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यासाठी नेमके काय निकष असणार, याची उत्सुकता सर्वांना लागलीय. कर्जमाफीची ही घोषणा आणि त्याबद्दलच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.))
व्हिओ -
ही आहे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या अर्थसंकल्पात केलेली सर्वात मोठी आणि लक्षवेधी घोषणा.
महायुतीच्या वचननाम्यात दिलेलं आश्वासन, बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीसाठी झालेलं आंदोलन आणि सरकारनं ३० सप्टेंबरपूर्वी कर्जमाफी करण्याचं दिलेलं आश्वासन या तीन गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही कर्जमाफीची घोषणा झालीय.
मात्र या कर्जमाफीवर शेतकरी नेते समाधानी नाहीत.
All Shows
































