Mumbai Crime: कांदिवलीत खळबळजनक घटना, पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, बायकोने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Mumbai Crime: कांदिवली पूर्वेत असलेल्या समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात पती-पत्नीच्या दररोज सुरू असलेल्या भांडामुळे पत्नीने टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवलीय.

Mumbai Crime News : मुंबईच्या कांदिवली पूर्वेत असलेल्या समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात पती-पत्नीच्या दररोज सुरू असलेल्या भांडामुळे पत्नीने टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली आहे. पत्नीनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हि घटना काल (शुक्रवारी) संध्याकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News : सततच्या भांडणाचा त्रास असह्य, मृत पत्नीच्या भावाची तक्रार, गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पती-पत्नीने लव मॅरेज केलं होतं. सुखी संसार सुरु असताना त्यांना दोन मुलं सुद्धा झालीत. मात्र अलीकडे त्यांच्यात दररोज घरात वाद होत होते. दरम्यन, सतत सुरू असलेला भांडणामुळे हा त्रास असह्य येऊन पत्नीने काल संध्याकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केलीय. दरम्यन, महिलेने टोकाचं पाऊल का उचलला? या संदर्भात महिलेचा भाऊ याच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
Mumbai Crime News : मरीन ड्राईव्ह येथे महिला ट्रॅफिक पोलिसांना शिवीगाळ अन् धमकी; कारचालक महिलेचा संताप
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात VVIP मूव्हमेंटदरम्यान वाहतूक नियंत्रण करत असलेल्या महिला ट्रॅफिक पोलिसांना एका कारचालक महिलेने अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास NSCI, मरीन ड्राईव्ह परिसरात घडला. मिळलेल्या माहितीनुसार, VVIP हालचालीमुळे परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी महिला ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी MH01 CD 8304 क्रमांकाची कार रस्त्यात उभी असल्याने संबंधित महिला पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितले. यावरून कारमधून उतरलेल्या एका महिलेने संताप व्यक्त करत महिला पोलिसांना उद्देशून अश्लील शिवीगाळ केली तसेच धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
साक्षीदारांच्या माहितीनुसार, त्या महिलेने महिला पोलिसांना उद्देशून अपमानास्पद शब्द वापरत “तुझे कपडे फाटेपर्यंत मारेन” अशी धमकी दिली. तसेच “नशीबवान आहेस, मी तुला आत्ता मारलं नाही,” असेही ती म्हणाल्याचे समजते. यावेळी संबंधित महिलेने स्वतःला एका राजकीय नेत्याची नातेवाईक असल्याचे सांगून दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर संबंधित महिला ट्रॅफिक पोलीस तक्रार देण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असता, तेथील एका पोलिस अधिकाऱ्याने “ये सब रोज होता है यहाँ,” असे सांगितल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















