Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपमुळे विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईसह विविध शहरांत दाखल झाले आहेत. याच पर्यटकांनी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळ गरीब नगर इथे मोठ्या प्रमाणात उभारलेली झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्ये मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. ही रील्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेबाबत टीकेची लाट उसळली आहे. जुनस रांटाला या परदेशी पर्यटकाने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये वांद्रे स्थानकातील अस्वच्छता आणि अनधिकृत बांधकामे यावर प्रश्न विचारले आहेत. वांद्रे पूर्व येथील स्थानकाला लागून असलेली अनधिकृत झोपडपट्टी गेली अनेक वर्ष कारवाई न केल्याने झपाट्याने वाढत आहे. केवळ एक दोन नाही तर ६ मजली इमले इथे उभारले गेले आहेत. विदेशी पर्यटकांना हे दिसले ते रेल्वे अधिकारी, महानगरपालिका आणि राज्य सरकारला का दिसत नाही हा प्रश्न आहे. याचाच रिअलिटी चेक केला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी….
























