एक्स्प्लोर

Ind vs Eng T20 World Cup 2026: तीन "अक्षर" विजयाची

Ind vs Eng T20 World Cup 2026: स्थळ किंग्सटन ओवल. ब्रिज टाऊन.. बार्बाडोस... दिनांक २९ जून २०२४..अंतिम सामन्याच्या नाणेफेकीचि गडबड....आफ्रिकन कर्णधार नाणेफेकीसाठी तयार... आणि मैदानावर एका बाजूला भारतीय कर्णधार रोहित शर्मा... एका खेळाडू सोबत चर्चा करीत आहे.. .तो त्याला सांगत आहे... "की तू खूप गुणवान आहेस..खरे तर तुझी अंतीम ११ मध्ये जागा बनते ... पण आज मी तुला खेळवू शकत नाही. ... आशा करतो तू मला समजून घेशील.." 
या घटनेचा उल्लेख करताना तोच खेळाडू रोहित शर्माच्या याच नेतृत्वगुणाबद्दल कौतुक करीत असताना म्हणाला की "मला कायम दुःख राहील की मी रोहित शर्मा सारख्या महान कर्णधार  याच्या नेतृत्वाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळू शकलो नाही." तो खेळाडू होता संजू सॅमसन .... आणि गेल्या दोन सामन्यात त्याने भारताच्या विजय गाथेत मोलाची कामगिरी करून  दोन्ही सामन्यात सामनावीराचा बहुमान. मिळवून भारतीय संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला.... मित्रानो... पोएटिक जस्टिस म्हणजे आणखीन वेगळं काय...? जी संधी नियतीने संजू सॅमसन याला नाकारली होती... ती संधी नियतीने पुन्हा त्याला दिली... आणि त्या संधीचं त्याने आपल्या अपार गुणवत्तेने आणि कष्टाने सोनं करून... भारताची विजयगाथा एका महानायकाच्या सारखी लिहिली...काल आपण नाणेफेकीचा कौल आपण हरलो... उपांत्य सामन्यात ते सुद्धा वानखेडे वर नाणेफेकीचा कौल हरून प्रथम फलंदाजी करणे आणि प्रतिपक्ष संघाला धावांच्या पाठलागासाठी संधी मिळणे खरे तर हाच विजयाचा संकेत असायला हवा होता.... पण भारतीय संघाच्या मनात काहीतरी वेगळ होतं.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संजू याने जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर एक चौकार ऑन साईडला वसूल करून दुसरा षटकार हुकच्या फटक्याने डीप फाईन लेग वर वसूल केला आणि आज सुद्धा आपण  ईडन गार्डन वरचा फॉर्म कॅरी करत आहोत हे दाखवून दिले.... इंग्लंड संघाने ठरल्याप्रमाणे दुसरे षटक विल जॅक्स या ऑफ स्पिनर ला दिले.... अभिषेक याने दोन चौकर वसूल देखील केले.... संजू अर्ध्या क्रिज वर जाऊन त्याची समजूत काढून म्हणाला. .. की घाई करण्याची गरज नाही सावकाश खेळ.... पण जेव्हा अपरिपक्वता हाच तुमचा स्थायीभाव असतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता.... आणि अभिषेक शर्मा याने तेच केलं.... तो केवळ बाद झाला नाही.... तर अंतिम सामन्यातील 11 मधील त्याच्या स्थानावर भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून गेला..... अभिषेक बाद झाल्यावर ईशान आणि संजू यांनी आक्रमकतेचा वसा काही सोडला नाही.... ईशान् याने  काही देखणे ऑफ ड्राइव्ह मारले.... पण मैदानावर पुन्हा एकदा फटक्यांचं प्रदर्शन भरवलं ते संजू यानेच...... १५ धावावर असताना आर्चरला तो एक लोफ्टेड  ऑन ड्राईव्ह खेळायला गेला आणि आपल्या क्रिकेट जीवनात कित्येक अशक्य झेल घेतलेल्या ब्रूक  याच्या हाती एक सोपा झेल गेला.  . पण यावेळी देखील नियती संजूच्या बाजूने होती... आणि ब्रूक  सारख्या एका उत्तम क्षेत्ररक्षकानं तो झेल सोडला..... आणि तिथेच त्याने सामना देखील सोडला.... कारण तिथून पुढे संजू नावाचा महानायक... भारताची विजयगाथा लिहिण्यासाठी सज्ज झाला..... त्या षटकात त्याने फ्रंट पुल   षटकार डीप मिडविकेट वरून आर्चरला मारला.... संजू काल थांबायला तयार नव्हता...आपले पहिले षटक घेऊन आलेल्या आदिल राशिद याला त्याने त्याच्या गुगली वर कव्हर मधून केवळ टायमिंग वर मौदानलगत सीमारेषे बाहेर पाठवले..तर डॉसन याला एक्स्ट्रा कव्हर वरून हवेत सीमारेषे बाहेर पाठवले.... सॅम करन जो भारतीय चाहत्यांना शांत करण्याच्या गमजा करीत होता त्याच्या हळुवार चेंडू ना संजू ने कधी आसमान दाखवलं तर कधी केवळ टायमिंग वर चौकार वसूल केले.... संजू याच्या अप्रतिम खेळीवर भारताने २५० धावांचा डोंगर उभारला....अर्थात यात शिवम् दुबे याला सूर्यकुमार यादव यांच्या अगोदर पाठविण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय  योग्य ठरला.... त्याने ४५ धावांची वेगवान खेळी खेळून... धाव गतीचा वेग कायम ठेवला..... 

२५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात अतिशय डळमळीत झाली.... सॉल्ट स्वस्तात माघारी परतला....आणि बुमरा याच्या हळूवार चेंडूवर ब्रूक खूप लवकर खेळला.....त्याचा एक उंच झेल कव्हर सीमा रेषेवर उंच उडाला ...५ सेकंदात २४ मीटर इतके अंतर पार करून त्याने मागे पळत जाऊन जमिनीवर झेपावत या विश्वचषकातील सर्वोत्तम झेल घेतला... 1983 च्या विश्वचषकातील विव रिचर्ड्स याचा जो  झेल कपिल यांनी झेल घेतला होता त्याची आठवण या झेल ने पुन्हा करून दिली... ब्रूक स्थिरावण्याच्या आधी स्वस्तात जाणं भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं....पण मग मैदानावर एन्ट्री झाली ती भविष्यातील एका महान फलंदाजाची.... बेथल जो काल लिथल बेथल वाटला ....पाहिलेच षटक घेऊन येणाऱ्या वरुण याला " तुझी मिस्टरी तुझ्या जवळच ठेव" असे सांगताना पहिला षटकार बॅकफूट वरून त्याच्याच डोक्यावरून सरळ मारला.... दुसरा षटकार फ्रंट फूट वरून एक्स्ट्रा कव्हर  वरून मारला... तिसरा षटकार रिव्हर स्वीप  चां डी पॉईंट सीमारेषेवरून मारला.... पण धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बटलर आणि बेनेट  यांना  वाटेत कुठेतरी अभिषेक भेटला असेल... आणि अभिषेक ने आपल्याकडची अपरिपक्वता बटलर आणि बेनेट याला देऊन टाकली... ज्या षटकात तीन चेंडूवर 18 धावा आल्या आहेत त्याच षटका मध्ये बटलर वरून याला बाद झाला.

जी गोष्ट बटलर याची तिच बेनेट याची अक्षर याच्या षटकात सलग दोन षटकार मारलेल्या बेनेट तिसरा षटकार मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला....या विश्वचषका त चार वेळा सामनावीराचा बहुमान मिळालेला यंग मैदानात आला.... त्याची जोडी बेथेल सोबत जमली सुद्धा... पण पुन्हा एकदा इंग्लंड संघ आणि विजय यांच्यामध्ये "अक्षर " आला आणि पुन्हा एकदा डीप पॉईंट सीमारेषेवर अक्षर याने या स्पर्धेतील आणखीन एक सर्वोत्तम झेल पकडला....आणि भारतीय संघासाठी विजयाचे दार उघडले....तीन षटकांमध्ये जवळजवळ 51 धावा हव्या असताना सूर्यकुमार यादव याने 18 व्या षटकात पुन्हा एकदा चेंडू जसप्रीत बुमराह यांच्या हातात दिला...आणि त्या निर्णायक षटकात बुमराह यांना केवळ सहा धावा दिल्या.....आपल्या ४ षटका मध्ये केवळ ३३ धावा देऊन हायवे सारख्या खेळपट्टीवर सुद्धा आपल्या गोलंदाजी ची धार कमी होऊ शकत नाही हे सिद्ध केले.....अर्थात हार्दिक याने चार षटकात केवळ 38 धावा देत त्याला मोलाची साथ दिली.....या विजय गाथेचा लेखक जरी संजू असला तरी "अक्षर" याने घेतलेल्या झेलने आणि बुमरा याच्या बुद्धिमान गोलंदाजीने ते सुद्धा सह लेखक झाले....

८ मार्च पुन्हा एकदा अंतिम सामना.... पुन्हा एकदा अहमदाबाद... क्रीडा रसिकांच्या मनात..१९ नोव्हेंबर 2023 ची भळभळत राहिलेली जखम आहे....फरक इतकाच की प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया नसून त्यांचा शेजारी आहे..... त्यावेळचा भारतीय कर्णधार... या वेळचा ब्रँड अँबेसिडर आहे.... पुन्हा एकदा पोएटिक जस्टीस नियतीच्या मनात असेल का?????

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget