Maharashtra Live blog updates: इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद; गॅस पुरवठा बंदमुळे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना अधिक गती देण्याची गरज असल्याचे मत महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केले आहे. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत.
यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये भटक्या श्वानांच्या प्रश्नावर अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने प्राणी व्यवस्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
महापौरांनी प्रशासनाला नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन प्राणी निवारा केंद्रे उभारणे, प्रत्येक प्रशासकीय प्रभागनिहाय श्वान पकडण्यासाठी विशेष वाहने उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईत मागील काही वर्षांत भटक्या श्वानांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच विविध प्रभागांमध्ये श्वान चावल्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र
वेगवेगळ्या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असून भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. युद्धामुळे विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद; गॅस पुरवठा बंदमुळे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी विशेष बैठक बोलावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















