एक्स्प्लोर

Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 Pitch Report : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे.

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 Pitch Report : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Final T20 World Cup 2026) यांच्यात रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी दोन्ही संघांचे खेळाडू आधीच अहमदाबादला पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्याच्या पिचकडे लागले आहे. विशेष म्हणजे या विश्वचषकात अहमदाबादमध्ये दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

फलंदाजांसाठी अनुकूल पिचची शक्यता (Narendra Modi Stadium Pitch Report)

अंतिम सामन्यासाठी वापरली जाणारी पिच फलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबईप्रमाणेच येथेही धावांचा पाऊस पडू शकतो. फायनलसाठी सेंटर पिचचा वापर केला जाणार असून ती लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पिचवर चांगला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, मात्र फिरकीपटूंना फारशी मदत मिळेल अशी शक्यता कमी आहे.

या स्पर्धेत आतापर्यंत या पिचवर फक्त एकच सामना झाला आहे. 9 फेब्रुवारीला कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचा मोठा स्कोअर उभारला आणि 53 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर जवळपास एक महिना या पिचवर कोणताही सामना झालेला नाही, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पिच पूर्णपणे फ्रेश असणार आहे.

अहमदाबादमध्ये दोन्ही संघांना बसला आहे धक्का

या टी-20 विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काहीसा चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. अहमदाबादमध्ये भारताने दोन सामने खेळले असून त्यापैकी एकात विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 76 धावांनी पराभव पत्करावा लागला.

न्यूझीलंडनेही येथे 14 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता. त्या सामन्यात कीवी संघाने 176 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 17.1 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज गाठले होते.

हे ही वाचा -

Ind Playing 11 vs Nz Final : कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 CSK vs SRH: IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG: 3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG : नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
PBKS vs LSG IPL 2026 : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
PBKS vs LSG : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Embed widget