Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
मुंबईत स्वतःचं घर असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी! आता मुंबईकरांच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे. कारण, महापालिकेने मालमत्ता कराबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
आता ७०० स्क्वेअर फूटपर्यंत असणाऱ्या घरांना कोणताही मालमत्ता कर (Property Tax) भरावा लागणार नाही.सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळालाय..
यापूर्वी ही सवलत केवळ ५०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना होती, ती मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. महापालिकेच्या सभागृहात हा निर्णय एकमताने मंजूर झालाय.
मुंबईत वाढत्या महागाईमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे सामान्य माणसाला घर टिकवणं कठीण झालं होतं. अनेकजण मुंबईबाहेर स्थलांतरित होत होते. हेच रोखण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जरी यामुळे पालिकेला ७०० कोटींचा महसूल तोटा होणार असला, तरी मुंबईकरांना हे 'महाभेट' देण्यात आली आहे.
मुंबईत घर घेणे सामान्य लोकांना अशक्य झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना त्यांचे अपार्टमेंट विकून मुंबईबाहेर जावे लागत आहे. याचा हवाला देत नगरसेवक फणसे यांनी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा सध्याच्या ५०० चौरस फूटावरून ७०० चौरस फूट करण्याचा प्रस्ताव मांडला. ठाकरे सेनेने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात मालमत्ता कर मर्यादा ७०० चौरस फूट पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते.
तर सरकारने घेतलेला हा निर्णय कसा वाटला?























