एक्स्प्लोर

Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?

28 फेब्रुवारी 2026 रोजी (ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले), इराणने भारताकडे तांत्रिक अडचणींमुळे 'लावन' या जहाजाला तातडीने Docking परवानगी मागितली होती.

Iranian Ship IRIS Lavan: अमेरिकेने श्रीलंकेजवळ इराणचे 'आयआरआयएस देना' (IRIS Dena) हे जहाज बुडवले, त्याच दिवशी (4 मार्च) इराणचे दुसरे जहाज 'आयआरआयएस लावन' भारताच्या कोची बंदरावर पोहोचले होते. 28 फेब्रुवारी 2026 रोजी (ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले), इराणने भारताकडे तांत्रिक अडचणींमुळे 'लावन' या जहाजाला तातडीने Docking परवानगी मागितली होती. भारताने 1 मार्च रोजी ही विनंती मान्य केली. सध्या या जहाजावरील सर्व 183 खलाशी (crew members) कोची येथील भारतीय नौदलाच्या तळावर सुरक्षितपणे वास्तव्यास आहेत.

'आयआरआयएस देना' (IRIS Dena) वरील अमेरिकेचा हल्ला

'मिलान' (MILAN) या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन इराणला परतत असताना, बुधवारी सकाळी श्रीलंकेतील गॅले (Galle) किनाऱ्यापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर एका अमेरिकन पाणबुडीने (Submarine) टॉर्पेडो डागून 'आयआरआयएस देना' हे इराणचे युद्धजहाज बुडवले. या हल्ल्यानंतर श्रीलंकेला समुद्रातून 87 जणांचे मृतदेह सापडले. 

भारतीय नौदलाचे बचावकार्य (Search & Rescue)

'देना' जहाजाकडून बुधवारी पहाटे मदतीचा संदेश (distress call) मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू केला. नौदलाने लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान, आयएनएस तरंगिणी (INS Tarangini) हे जहाज आणि कोचीहून आयएनएस ईक्षक (INS Ikshak) हे सर्वेक्षण जहाज श्रीलंकेच्या मदतीसाठी घटनास्थळी पाठवले होते. एका विमानातून तातडीने जीवरक्षक नौका (life rafts) टाकण्याचीही तयारी ठेवण्यात आली होती. इराणी युद्धनौका बुडवल्यानंतर देशातील विरोधी पक्षांसह संरक्षण तज्ञांनी पीएम मोदी आणि केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इराणच्या या खलाशांना "भारताचे सन्माननीय पाहुणे" म्हणत, सरकारने सागरी महासत्ता म्हणून आपली जबाबदारी झटकल्याचा (abdication of responsibilities) आरोप विरोधकांनी केला आहे.

इराण आणि अमेरिकेची प्रतिक्रिया 

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या या कारवाईला "समुद्रातील क्रूरता" (atrocity at sea) म्हटले असून, अमेरिकेला याचा 'कडवा पश्चात्ताप होईल' असा इशारा दिला आहे. बुडवलेल्या या जहाजावर सुमारे 130 खलाशी होते. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी या टॉर्पेडो हल्ल्याची पुष्टी करत 'देना' जहाजाला एक "प्राईज शिप" (prize ship) म्हटले आहे. तसेच, अमेरिका-इस्रायलची ही लष्करी कारवाई आता केवळ इराणच्या सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते असे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget