Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
तेजस एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून निघाली आहे...सकाळी ५.५० वाजता सुटणारी गाडी १२.५८ ला सुटली
तेजस एक्सप्रेस उशिरा धावण्याचे कारण
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मॉन्सून पूर्व मेंटेनांस कामासाठी ब्लॉक सुरू आहेत, याच कारणांमुळे अनेक मुंबईतून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्सप्रेस उशिराने धावत आहेत
तेजस एक्सप्रेस देखील काल मडगाव एथून दुपारी ३.३५ वाजता सुटायला हवी होती मात्र रात्री १०.०० वाजता सुटली आणि आज सकाळी ८.४१ तास उशिराने मुंबईतील दादरला पोचली, जी काल रात्री ११.३२ वाजता पोहोचायला हवी होती,
कोकणातून येणारी गाडीच उशिरा आल्याने मुंबईत गाडीचा बेसिक मेंटेनंस, साफसफाई करून पुन्हा कोकणात जाण्यास मध्य रेल्वेला ७ तासांचा वेळ लागला,
त्यात शिमगा असल्याने कोकणात जाणारी गर्दी जास्त असते, त्यासाठी अधिकच्या स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत,
आधीच नेहमीच्या गाड्या उशिराने त्यात आणखीन एक्सप्रेस सोडण्यात आल्या, त्यामुळे गाड्या अजून जास्त उशिराने धावत आहेत.





















