Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
भारतात इंधनाच्या टंचाईची भीती निर्माण झाली असताना आता हे युद्ध लांबणार का, याचीही चिंता सतावू लागलीये. कारण आठवडा झाला तरी कुणीही मागे हटण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. आता तर अमेरिकेनं १०० दिवस, म्हणजे ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ युद्ध लढण्याच्या दिशेनं प्लॅनिंग सुरू केलंय... डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'हंड्रेड डेज प्लॅन'वर हा स्पेशल रिपोर्ट....
अमेरिकेचं 'ऑपरेशन एपिक फ्युरी' आणि इस्रायलचं 'ऑपरेशन लायन्स रोअर' लांबत चाललंय...
युद्धाच्या सातव्या दिवशी इस्रायल-अमेरिकेनं क्षेपणास्त्रं आणि हवाई हल्ल्यांचा वेग वाढवला...
विशेषतः इराणची राजधानी तेहरानची अक्षरशः चाळण झालीये... अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात...
तरीही इराणचे राज्यकर्ते शरण येण्यास तयार नाहीत...
आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या तळांना आणि तिथल्या प्रमुख इमारतींना इराणी ड्रोनचे हल्ले सहन करावे लागतायत...
त्यामुळे तीन ते चार आठवड्यांत युद्ध संपवण्याची भाषा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष आता १०० दिवसांच्या युद्धाची योजना आखतायत...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं, म्हणजे लष्करी मुख्यालयानं 'पेंटागॉन'ला एक पत्र पाठवलंय...
यात फ्लोरिडामधील ताम्पा इथल्या आपल्या मुख्यालयात आणखी गुप्तचर अधिकारी पाठवण्याची विनंती करण्यात आलीये...
इराणवर सुरू केलेल्या कारवाईत पुढील १०० दिवसांचं नियोजन करण्यासाठी ही विनंती करण्यात आल्याचं समजतंय...
All Shows
































