एक्स्प्लोर

Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding : डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरने 5 मार्च रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न केलं.

Arjun Tendulkar News : खेळाडू आपल्या खेळाबद्दल किती वेडे असतात, याची अनेक उदाहरणे वेळोवेळी पाहायला मिळतात. भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग वडिलांच्या निधनानंतरही टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात सामील झाला होता. तर काही खेळाडू महत्त्वाचे कौटुंबिक कार्यक्रमही सोडून मैदानात उतरतात. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावलेला नसला तरी खेळाबद्दलची त्याची जिद्द मात्र तितकीच जबरदस्त आहे. म्हणूनच लग्नाच्या अवघ्या 24 तासांतच तो आपल्या संघासाठी मैदानात उतरला.

लग्नानंतर 24 तासांतच मैदानात

डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरने 5 मार्च रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न केलं. या लग्नसमारंभाला भारतीय क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांसह उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि अपेक्षेप्रमाणे त्याची जोरदार चर्चा देखील झाली. मात्र आता चर्चेत आहे ती अर्जुनची खेळाबद्दलची जिद्द. लग्नाला अवघे 24 तासही पूर्ण झाले नव्हते आणि अर्जुन पुन्हा एकदा आपल्या संघाची जर्सी घालून मैदानात उतरला.

जर हा सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेचा असता तर कदाचित एवढे आश्चर्य वाटले नसते. मात्र अर्जुनने मुंबईतील डीवाय पाटील टी-20 ट्रॉफी या स्थानिक पण महत्त्वाच्या स्पर्धेत पुनरागमन केले. या हंगामात तो डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळत होता आणि लग्नाआधीच्या सामन्यांत त्याने संघासाठी महत्त्वाचे योगदानही दिले होते. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी संघाचा उपांत्य फेरीचा सामना असल्याने अर्जुन मैदानात उतरण्यास सज्ज झाला.

अर्जुन आणि वैभव दोघेही अपयशी, संघाचा पराभव 

मात्र, हा सामना अर्जुन आणि त्याच्या संघासाठी फारसा यशस्वी ठरला नाही. उपांत्य फेरीत डीवाय पाटील ब्लूचा सामना मुंबई कस्टम्सशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्लू संघाला 20 षटकांत 156 धावांपर्यंतच मजल मारता आली.

या संघात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील होता. मागील सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत 67 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र या वेळी तो काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 3 चेंडूत खातेही न उघडता बाद झाला. अर्जुन तेंडुलकरलाही केवळ 9 धावा करता आल्या. संघाकडून कर्णधार शशांक सिंहने 24 चेंडूत 42 धावांची सर्वाधिक खेळी केली.

156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई कस्टम्सने आक्रमक फलंदाजी करत 16 षटकांतच लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले. गोलंदाजीतही अर्जुनचा दिवस खराब ठरला. त्याने टाकलेल्या एका षटकात तब्बल 20 धावा दिल्या.

हे ही वाचा -

Akeal Hosein on Cristiano Ronaldo : मला वाचवा... भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूची इन्स्टाग्रामवर 60 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सुपरस्टारकडे धाव, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SHR vs CSK Live Update IPL 2026 : चेन्नईने जिंकली टॉसची 'बाजी'! ऋतुराजने हैदराबादला धाडलं फलंदाजीला; धावांचा पाऊस पडणार?
SHR vs CSK Live Score : चेन्नईने जिंकली टॉसची 'बाजी'! ऋतुराजने हैदराबादला धाडलं फलंदाजीला; धावांचा पाऊस पडणार?
RCB vs DC IPL 2026 : 12 षटकांत 122/3... तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण 'व्हिलन'?
12 षटकांत 122/3... तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण 'व्हिलन'?
RCB vs DC Live Score Update : 122/3 वरून 175 वरच ब्रेक! RCB चा शेवटचा 5 ओव्हरचा फ्लॉप शो, दिल्ला जिंकण्यासाठी 176 धावांची गरज
RCB vs DC Live : 122/3 वरून 175 वरच ब्रेक! RCB चा शेवटचा 5 ओव्हरचा फ्लॉप शो, दिल्ला जिंकण्यासाठी 176 धावांची गरज
IPL 2026 Playoffs Race : अजिंक्य रहाणे बेजार! आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीतून कोलकाता OUT?, मुंबई इंडियन्सचं काय झालं? वाचा संपूर्ण समीकरण
अजिंक्य रहाणे बेजार! आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीतून कोलकाता OUT?, मुंबई इंडियन्सचं काय झालं? वाचा संपूर्ण समीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Embed widget