Mumbai Cruise Drugs : 10 दिवसाच्या तुरुंगवासानंतर आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी दहा दिवस कोठडीत मुक्कामी असणाऱ्या शाहरुख पुत्र आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणी आता सतीष मानेशिंदे यांच्यासोबतच ज्येष्ठ वकील अमित देसाई हेसुद्धा कोर्टात आर्यनची बाजू मांडताना दिसणार आहेत. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खान याच्यावरील हिट अँड रन प्रकरणात अमित देसाई यांनीच सलमानची बाजू कोर्टात मांडली आणि त्याला जामीन मिळवून दिला होता. दुसरीकडे एनसीबी या जामीन अर्जाचा विरोध करण्याची शक्यता आहे. ड्रग्ज विकणारे, पुरवणारे आणि इतर आरोपींच्या चौकशीत काही पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती मिळतेय. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीनावरही आज सुनावणी होणार आहे.























