एक्स्प्लोर

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना अखेर ब्रेक लागला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं. ज्या नेत्यासोबत विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, तो नेताच आता हयात नसल्यानं विलिनीकरणाची शक्यता आता नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेचा अर्ज दाखल केला. भाजपनं चार, शिवसेनेनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि मविआनं एक उमेदवार दिल्यानं राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं केली आहे. 

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अयशस्वी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या सात दिवस आधी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला होता. मविआकडून शरद पवार यांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार त्यामुळे अजूनही विचार करता येईल, अशा स्वरापाचा तो प्रस्ताव होता. 

शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून राज्यसभेची 6 वर्षांची टर्म दिली जावी.तर पार्थ पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर उमेदवारी दिली जावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी पक्षाकडून यावर कोणतेच उत्तर न आल्याने अखेर शरदचंद्र पवार पक्षाने मविआकडून उमेदवारी घेत अर्ज भरला आणि आता ही निवडणूक बिनविरोध होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून मविआतर्फे म्हणजेच पक्षाच्यावतीनं एक आणि अपक्ष म्हणून एक असा अर्ज शरद पवारांनी दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या इतर घटकपक्षांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पाठिंब्याबाबत निर्णय घेतला.  अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसकडून राज्यसभेसाठी मविआकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण कोण जाणार? 

महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 19 जण निवडून जातात. त्या 19 जणांपैकी 7 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रातून राजकीय पक्षांनी 7 जणांच्या नावाची घोषणा केल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Eknath Shinde: पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करुन टाकली, सज्जड दमही दिला...; एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय काय घडलं?
पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करुन टाकली, सज्जड दमही दिला...; एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय काय घडलं?
Baramati : बारामती बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन, शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
बारामती बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन, शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
Baramati Election : बारामती पोटनिवडणूक रंगतदार! काँग्रेस ठाम, तर ठाकरे अन् शरद पवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
बारामती पोटनिवडणूक रंगतदार! काँग्रेस ठाम, तर ठाकरे अन् शरद पवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget