Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Eknath Shinde : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर कक्षात पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं सांगितलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देणार असल्याचं शिंदेंनी म्हटलं.
एकनाथ शिंदे म्हणाले की अर्थसंकल्पावर दुखाचे सावट होतेच. अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्यमंत्री अर्थशास्त्रज्ञ आहेत, पुस्तक आहे ना त्यांचे, मी पुस्तक वाचलं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की व्हिजन असलेला हा अर्थसंकल्प आहे, व्हिजनरी आणि खंबीर वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. अनेक प्रकल्प घेतलेत, अनेक योजना बंद होणार असं बोललं जात होतं. मात्र, आम्ही अनेक गोष्टी घेतल्या, रस्त्यांचे जाळे निर्माण करणार आहोत. शहरासोबत ग्रामीण विकास झाला पाहिजे. मेट्रो, रस्ते जाळे तयार करण्याचा विचार आहे. 8-10 लाख कोटींची कामं आपल्याकडे सुरु आहेत, पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी बजेट वाचताना सगळ्या प्रकल्पांची माहिती दिली आहे. मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणे असेल, वाढवणपर्यंत कनेक्टिविटी असेल, समृद्धीला जोडणं असेल यासंदर्भातील कामांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.
हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा आहे. विकसित भारतासाठी महाराष्ट्रातून मोठं योगदान द्यायचं आहे. 1 ट्रिलियन डॉलरचं ध्येय आहे. नीती आयोगाने सांगितलं मुंबई एमएमआरमध्ये 1.25 ट्रिलियन डॉलरचे बळ आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
राज्य सरकारनं अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली.आम्ही आज कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफी कधी करणार…असे प्रश्न विचारले जात होते. आज मुख्यमंत्री यांनी योग्य वेळ सिद्ध केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मविआनं 50 हजार इन्सेस्टिव्ह देणार अशी घोषणा केली होती, ते आम्ही दिले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, सुरुच राहणार आहे. विरोधक 2100 रुपये कधी देणार असं विचारतात. योग्य वेळी आम्ही देणार आहोत. आम्ही फक्त बोलत नाही करतो असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
बळीराजा मागे महायुती उभी राहिली आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला काही कमी पडणार नाही. आरोग्य आपल्या दारी हे योजना देखील आपण आणतोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या






















