Vinesh Fogat Disqualified : विनेश फोगट अपात्र, नेमकं काय घडलं?
Vinesh Fogat Disqualified : विनेश फोगट अपात्र, नेमकं काय घडलं?
विनेश फोगाटसंबंधी काही महत्वाची निरिक्षणं
१) विनेश फोगट ही मूळची ५३ किलो वजनी गटाची पैलवान होती.
२) पण ५३ किलो वजनी गटातून पैलवान अंतिम पंघाल खेळत असल्यानं विनेशसमोर ५० किलो वजनी गटातून खेळण्याचा पर्याय होता.
३) किर्गिस्तानमधल्या आशियाई पात्रता कुस्तीत खेळून ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो गटात खेळण्यासाठी पात्र ठरली.
४) पण मूळ ५३ किलो वजनी गटातल्या पैलवानाला सतत ५० किलोच्या आत राहाणं सोपं नसतं.
५) त्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन एकऐवजी दोन दिवसांवर झालं. त्यामुळं पैलवानांची वजनं एकऐवजी दोन दिवसं होणार हे निश्चित झालं होतं.
६) या परिस्थितीत विनेशचं वजन दोन दिवस नियंत्रणात राहण्यासाठी अधिक दक्ष राहाणं अपेक्षित होतं.
७) विनेशचं कुस्तीच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल सकाळी भरलेलं वजन ५० किलोच्या आत होतं. त्यामुळं काल ती खेळू शकली.
८) पण काल तीन कुस्त्या जिंकताना, त्यादरम्यान आणि त्यानंतर काय खाल्लं, ती किती पाणी प्यायली यावर लक्ष ठेवण्याची आवश्कता होती. ते झालं का?
९) दिवसभरात तीन कुस्त्या खेळून थकलेल्या विनेश फोगटला तिचं वजन घटवण्यासाठी आणखी किती मेहनत घ्यावी लागली?
१०) विनेशचं १०० ग्रॅम जादा वजन घटवण्यासाठी आणखी काय करता आलं असतं? कारण तिच्या सासरे राजपाल राठी यांनी केस बारीक करता आले असते असा पर्याय बोलून दाखवला आहे.