Top 70 at 7AM Superfast 08 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Top 70 at 7AM Superfast 08 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
दलित व्यक्तीला मारहाण करताना संतोष देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या, सरपंच आंदोलनातून भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप, आरोपींचा तेरे नाम व्हायला हवं, धस यांचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रिपदाला बीडपाठोपाठ धाराशिवकरांचा विरोध, सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन, बीडचा बिहार केला, आता धाराशिवचा नको, मराठा कार्यकर्त्यांची भूमिका.
मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून अजित पवारांना पत्र, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकावं आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागणी
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही प्रश्न उपस्थित करत असू तर ते त्यांच्यावर संशय घेण्यासारखं, बीड प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आज ओबीसी समाजाचे आंदोलन, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन