(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Metro 3 Carshade च्या मार्गातला एक अडथळा दूर, पर्यावरणप्रेमींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
Metro 3 Carshade च्या मार्गातला एक अडथळा दूर, पर्यावरणप्रेमींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
मेट्रो ३ कारशेडच्या मार्गातला एक अडथळा दूर. सुप्रीम कोर्ट किंवा पालिका वृक्षप्राधिकरण समितीकडे अर्ज करा. मेट्रो 3 कारशेडच्या मार्गातील आणखीन एक अडथळा दूर. आरे कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टानं निकाली काढली. पर्यावरणप्रेमी याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालय किंवा पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे याबाबत रितसर अर्ज करण्याचे निर्देश. केवळ 84 झाडं कापण्याची परवानगी दिलेली असताना एमएमआरडीएलकडून 177 झाडं कापण्याची मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडे परवानगी मागितल्याचा करण्यात आला होता विरोध. प्रस्तावित जागेत एक इंचही वाढ केलेली नसल्याचा प्रशासनाचा दावा. तसेच याचिकाकर्त्यांच्या सतत आडकाठीमुळेच तिथं झाडांची संख्या वाढल्याचा राज्य सरकारचा दावा.