केंद्राकडून राज्याला रात्रीची संचारबंदीची लागू करण्याची सूचना,केंद्राच्या सूचनांची अंमलबजावणी?
केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.
टोपे म्हणाले, केरळ राज्यातील ओनम सणामुळे वाढलेला कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राने राज्याला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केलीय. आगामी काळात राज्यातील सणवार पाहता या बाबत काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत तिथे शाळा सुरू होऊ शकतात का याची चाचपणी करतोय. 5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राइव्ह घेण्यात येणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.