Manoj Jarange Shantata Rally : "राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 तासात निर्णय होऊ शकतात"
Manoj Jarange Shantata Rally : "राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 तासात निर्णय होऊ शकतात" मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीपासून सुरुवात होत आहे. मराठा ताकदीने एकत्र येणार आहे. आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील. त्यांनी याआधीही असे केले आहे. आमच्या पुढे आंदोलन करणे, सभा घेणे. आम्ही जे करत आहोत तेच करणे. मात्र, परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, अशी टीका त्यांनी यावेळी छगन भुजबळांवर केली आहे. शांतता रॅली सुरू असली तरी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहेत. 123 जागा शोधल्या आहेत. पाचव्या टप्यात मुंबईत रॅली काढणार आहे. फडणवीस म्हणतात काँग्रेसने आरक्षण दिले नाही, त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्ही द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
![Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/ac7932b4419d51ef10f723c1edd3f53817378822034311000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/ace1be4f75c5fb57594068dc903a240f17378651194701000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/d57096e6903c3ebd150d6a1f5c0bb9c01737169315029718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Santosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/0a0230fcc21cc35d9ebbff7010143bd3173191398049990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Hingoli Prakash Thorat : हिंगोलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने काँग्रेस नाराज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/27/7044ab07d42ed226f2c30fd466cb1ba21729997246092719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)