कोल्हापूर : एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स, कोल्हापुरात 'झिरो पेंडन्सी' उपक्रम
कोल्हापूरच्या परिवहन कार्यालयाद्वारे आता अवघ्या एका दिवसात वाहन चालवण्याचे लायसन्स देण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांत वाहनचालकांना आपले पक्के लायसन्स मिळत आहे.
‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या कागदपत्रांसाठी सर्वसामान्यांना अनेकदा सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. यामध्ये पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो. अशातच ‘झिरो पेंडन्सी’ सारख्या उपक्रमांद्वारे अवघ्या एका दिवसात शिकाऊ आणि पक्के लायसन्स मिळत असल्याने वाहनचालकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा दिल्यानंतर सरकारी कार्यालयांचेही डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया चालू झाली होती.
कोल्हापूर परिवहन कार्यालयाद्वारे राबवला जाणारा हा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. देशभरात अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात यावा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/98c695f542496ff3316d995624de5c3e1739437783848976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/03d5208d63631908306a3e5636eb31091739433295696976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 13 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/96ee709833f1533c591579d4688e777d1739431693717976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ladka Bhau Yojana Sangli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी काय? सांगलीत मेळवा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/8226e555ce1139462b1530a7719556f61739429999925976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f7e5fb6eb49a5379acc69107c3466e361739427436194976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)