एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कपिल देव, द्रविडसह या क्रिकेटर्सचा आतापर्यंत 'पद्मभूषण'ने सन्मान
‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पद्म पुरस्कारांसाठी धोनीचं नाव सुचवल्याच्या वृत्तावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
‘पद्मभूषण’ हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीची एकमताने निवड झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे धोनीशिवाय इतर कुठल्याही क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी बीसीसीआयने केलेली नाही.
यापूर्वीही काही भारतीय क्रिकेटर्सना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. देशाला पहिल्यांदाच विश्वविजेता करणाऱ्या कपिल देव यांचा 1991 साली ‘पद्मभूषण’ने गौरव करण्यात आला होता. कपिल देव यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांच्या नावावर 5 हजार 248 धावा आणि 8 शतकं आहेत. तर 225 वन डे सामन्यांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये त्यांच्या नावावर 3 हजार 783 धावा आहेत.
लिटल मास्टर सुनील गावसकर यांना 1980 साली ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आलं. गावसकर यांनी 125 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांच्या नावावर 10 हजार 122 धावा आणि 34 शतकं आहेत. तर 108 वन डे सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यात 3092 धावा आणि एक शतक आहे.
द वॉल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला 2013 साली ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आलं. 164 कसोटी सामन्यांमध्ये द्रविडने 13 हजार 288 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 36 शतकांचा समावेश आहे. तर 344 वन डे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 12 शतकं आणि 10 हजार 889 धावा आहेत.
डी. बी देवधर हे महाराष्ट्राचे प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांना 1991 साली ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आलं. डी. बी. देवधर यांनी 81 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4 हजार 522 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 9 शतकांचा समावेश आहे.
‘पद्मभूषण’ चंदू बोर्डे यांनी त्यांच्या कारकीर्दीत 55 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 3061 धावा आणि 5 शतकं केली. त्यांना 2002 साली या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
क्रिकेटर्समध्ये सी. के. नायडू यांना सर्वात अगोदर ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आलं. त्यांना 1956 साली हा पुरस्कार देण्यात आला. नायडू यांना भारताकडून 7 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांच्या खात्यात 350 धावा आहेत. शिवाय 207 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 26 शतकं आणि 11 हजार 825 धावा त्यांच्या नावावर आहेत.
1991 साली लाला अमरनाथ यांनाही ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आलं होतं.
राजा भलेंद्र सिंह यांना 1983 साली ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आलं होतं.
वीनू मंकड यांना 1973 साली ‘पद्मभूषण’ देण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement