IND vs ENG : रवींद्र जाडेजाच्या शतकानं सरफराजचा घात, कर्णधार रोहित शर्माला राग अनावर VIDEO
Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND vs ENG) कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतकी खेळी केलीये.
![IND vs ENG : रवींद्र जाडेजाच्या शतकानं सरफराजचा घात, कर्णधार रोहित शर्माला राग अनावर VIDEO Rohit Sharma got Angry when Sarfaraz Khan got run-out IND vs ENG Third Test Marathi news IND vs ENG : रवींद्र जाडेजाच्या शतकानं सरफराजचा घात, कर्णधार रोहित शर्माला राग अनावर VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/754ddfd6efdb091895bd6c5023ebcfd41708011620509924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND vs ENG) कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतकी खेळी केलीये. भारतीय संघ अडचणीत असताना मैदानात उतरलेल्या रोहितने 131 धावांची खेळी केली. त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले. दरम्यान, रोहित शर्माचा एक वेगळाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजकोट कसोटीतून सर्फराज खानने (Sarfraj Khan) पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावत 66 चेंडूमध्ये 62 धावा ठोकल्या. राजकोटच्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 326 धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि नवख्या रजत पाटीदारला मोठी कामगिरी करता आली नाही.
कर्णधार रोहित शर्माला राग अनावर
सर्फराज खानने पदार्पणातच दमदार कामगिरी केली. मात्र, ज्या पद्धतीने सर्फराज धावबाद झाला,ते पाहून रोहित शर्मा रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. ड्रेसरुममध्ये त्याचा राग दिसून येत होता. यावेळी रोहितने त्याची टोपीही फेकून दिली. दरम्यान, रोहितचा हा व्हिडीओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. यावर सोशल मीडिया लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
Angry Rohit Sharma when sarfaraz Khan got run-out. pic.twitter.com/WHhFX6x1cQ
— HM sports (@HMSports_18) February 15, 2024
जाडेजाच्या शतकाच्या नादात सरफराज धावबाद
रवींद्र जाडेजा 99 धावांवर फलंदाजी करत होता. यावेळी सर्फराज आणि जाडेजाकडून धाव घेण्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे आक्रमकपणे फटकेबाजी करणारा सरफराज धावबाद होऊन तंबूत परतला. त्याने दरम्यान, रवींद्र जाडेजा 99 धावांवर असताना, एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जाडेजाचा कॉल फसला, त्यामुळे तुफान फॉर्ममध्ये खेळत असलेला सरफराज धावबाद झाला. सरफराजने 62 धावा केल्या. पहिल्याच सामन्यात त्याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावत 66 चेंडूमध्ये 62 धावा ठोकल्या.
रवींद्र जाडेजाचं शतक (Ravindra Jadaje hundred)
रवींद्र जाडेजाने घरच्या मैदानावर शतकी खेळी केली. भारताने लवकर विकेट्स गमावल्यानंतर त्याने रोहितसोबत मोठी भागिदारी रचली. पहिल्या डावात त्याने कारकिर्दीतील चौथे शतक ठोकले. रवींद्र जाडेजाने 212 चेंडूत 110 केल्या असून तो पहिल्या दिवसअखेर नाबाद राहिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)