एक्स्प्लोर

Akeal Hosein on Cristiano Ronaldo : मला वाचवा... भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूची इन्स्टाग्रामवर 60 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सुपरस्टारकडे धाव, नेमकं काय घडलं?

West Indies Stranded In India : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील वेस्ट इंडिजचा प्रवास 1 मार्चलाच संपला.

Iran Israel Conflict Affect In India : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील वेस्ट इंडिजचा प्रवास 1 मार्चलाच संपला. सुपर-8 सामन्यात त्यांना टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला आणि स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही वेस्ट इंडिजचे खेळाडू अजून आपल्या देशात परतू शकलेले नाहीत. त्यामुळे संघाचा अष्टपैलू खेळाडू अकील हुसेन याने नाराजी व्यक्त केली आहे.

इस्रायल आणि इराण तणावामुळे परिणाम

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर परिणाम झाला आहे. या परिस्थितीत अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून वेस्ट एशियातील अनेक विमानतळांवर अलर्ट वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचे खेळाडू अजूनही भारतात अडकून पडले आहेत. याच परिस्थितीचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत अकील हुसेनने ख्रिस्टियानो रोनाल्डोला टॅग केले. इन्स्टाग्रामवर 60 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या रोनाल्डोकडे धाव घेतली.

दरम्यान, अकील हुसेनने X (माजी ट्विटर) वर एक पोस्ट करत हलक्या-फुलक्या अंदाजात पोर्तुगालचा फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोकडे मदतीची मागणी केली. “मला इथून बाहेर काढण्यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डोने चॉपर पाठवला तर बरे होईल,” असे त्याने मजेशीर शैलीत लिहिले. “हो… आणि स्वतःही यावं,” असेही त्याने त्या पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र काही वेळानंतर अकील हुसेनने ही पोस्ट डिलीट केली. तरीही त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 

दरम्यान, क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) ने गुरुवारी सांगितले की, खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्यासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि पुढील 24 तासांत त्यांना रवाना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेस्ट इंडिज संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, ‘एअर ट्रॅफिक’ची अंतिम परवानगी मिळण्याची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे.

बंगाल क्रिकेट संघटनेच्या (CAB) एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या रवाना होण्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.” पण, दक्षिण आफ्रिकेचे चार खेळाडू आगामी द्विपक्षीय मालिकेसाठी शुक्रवारी रात्री न्यूझीलंडला रवाना होऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. “दक्षिण आफ्रिकेचे चार खेळाडू आज रात्री न्यूझीलंडला जाऊ शकतात, मात्र औपचारिक पुष्टीची प्रतीक्षा आहे,” असेही त्यांनी सांगितले. 

हे ही वाचा -

Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Rana Fined : IPL मध्ये राडा झालाच! मॅच खेळायला नाही, तर नितीश राणावर बीसीसीआयचा थेट 'हंटर', दिली मोठी शिक्षा, नेमकं काय घडलं?
IPL मध्ये राडा झालाच! मॅच खेळायला नाही, तर नितीश राणावर बीसीसीआयचा थेट 'हंटर', दिली मोठी शिक्षा, नेमकं काय घडलं?
CSK vs DC IPL 2026 : चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Movie Cars: हमर ते टोयोटा लँड क्रूझर, रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमात दिसल्या 'या' पॉवरफुल गाड्या, फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल थक्क!
हमर ते टोयोटा लँड क्रूझर, रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमात दिसल्या 'या' पॉवरफुल गाड्या, फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल थक्क!
iran war live update: इराणच्या स्वागताला लष्करी वर्दीत अन् अमेरिकेच्या स्वागताला सुटाबुटात; पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन पेहराव का केले? यामागे नेमक रहस्य दडलंय तरी काय??
इराणच्या स्वागताला लष्करी वर्दीत अन् अमेरिकेच्या स्वागताला सुटाबुटात; पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन पेहराव का केले? यामागे नेमक रहस्य दडलंय तरी काय??
Mark Carney: ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Embed widget