एक्स्प्लोर

Ind Playing 11 vs Nz Final : कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

Ind vs Nz T20 World Cup 2026 Final Playing 11 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Ind vs Nz T20 World Cup 2026 Final Playing 11 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र या विजयासोबतच टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांची चिंता देखील वाढली आहे. विशेषतः जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर-1 टी-20 गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांच्या अलीकडील कामगिरीमुळे अंतिम सामन्यापूर्वी संघरचनेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे फायनलपूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी (8 मार्च) टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या विजेतेपदासाठी न्यूझीलंडचा सामना करणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला अद्याप न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघांमधील आतापर्यंत झालेले तीनही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर संडे (8 मार्च) रोजी होणारा हा अंतिम सामना भारतासाठी मोठ्या युद्धापेक्षा कमी नसणार आहे.

वरुण चक्रवर्तीने वाढवली चिंता (Varun Chakaravarthy Ind vs Nz T20 World Cup 2026 Final)

दुसरीकडे, वरुण चक्रवर्ती सध्या अपेक्षित फॉर्ममध्ये दिसत नाहीत. त्याने या स्पर्धेत 8 सामन्यांत 13 बळी घेतले असले तरी त्याची इकॉनॉमी रेट 8.85 इतकी महागडी ठरली आहे. उपांत्य फेरीत 4 षटकांत तब्बल 64 धावा त्याने दिल्या, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब प्रदर्शन ठरले. मागील चार सामन्यांत केवळ प्रत्येकी एकच विकेट घेतली असून त्याने तीन वेळा 40 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला तो किफायतशीर आणि धोकादायक गोलंदाज म्हणून समोर आला होता, मात्र अलीकडील सामन्यांत दबावाखाली तो महागडा ठरताना दिसला.

भारतीय संघात कुलदीप यादवसारखा स्टार फिरकीपटूही उपलब्ध आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात, त्यामुळे फायनलमध्ये कुलदीपला संधी मिळू शकते. वरुणकडे ‘मिस्ट्री स्पिन’ची ताकद असली तरी त्याच्या अलीकडील घसरत्या फॉर्ममुळे टीम मॅनेजमेंटला विचार करावा लागत आहे. आता व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास ठेवणार की बदल करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिषेक शर्माला संधी मिळणार का? (Abhishek Sharma Ind vs Nz T20 World Cup 2026 Final)

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा सलामीवीर आणि जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज अभिषेक शर्माची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट जवळपास शांतच राहिली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये अभिषेक शर्मा फक्त 9 धावा करून बाद झाला. ऑफ-स्पिनर विल जॅक्सच्या चेंडूवर तो फिल सॉल्टच्या हाती मिडविकेटवर झेलबाद झाला. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 55 धावांची खेळी केली होती, मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म पुन्हा घसरला. या वर्ल्ड कपमध्ये त्याने 7 डावांत केवळ 89 धावा केल्या असून त्याची सरासरी 12.71 इतकी खराब राहिली आहे.  

दरम्यान, भारतीय फलंदाजी क्रमात बदल करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. काही माजी खेळाडूंनी मिडल ऑर्डर मजबूत करण्यासाठी रिंकू सिंगला संघात सामील करण्याचा सल्ला दिला आहे. तर ईशान किशनला संजू सॅमसनसोबत सलामीला पाठवण्याचाही पर्याय सुचवला जात आहे. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर त्या सामन्यात अभिषेक शर्माने मोठी खेळी केली, तर त्याच्या खराब फॉर्मवरील चर्चा थांबू शकते.

अहमदाबादमध्ये संभाव्य प्लेइंग-11

अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत खेळवलेलीच टीम जवळपास कायम ठेवण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांत मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे.

पण, अहमदाबादच्या खेळपट्टीवर कुलदीप यादव प्रभावी ठरू शकतो. त्याने आतापर्यंत 54 टी-20 सामन्यांत 95 विकेट घेतल्या आहेत. येथे न्यूझीलंडविरुद्ध एक सामना खेळला होता, ज्यात भारताने 166 धावांनी विजय मिळवला होता. मात्र त्या सामन्यात कुलदीपने फक्त एक षटक टाकत 12 धावा दिल्या होत्या.

भारताची टी-20 वर्ल्ड कप फायनलसाठी संभाव्य प्लेइंग 11(India playing 11 for T-20 World Cup final)

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती / कुलदीप यादव.
 
हे ही वाचा -

Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad News : बीसीसीआयचा 'ब्रह्मास्त्र' सज्ज, एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ मैदानात उतरणार; श्रेयस अय्यर कर्णधार?
बीसीसीआयचा 'ब्रह्मास्त्र' सज्ज, एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ मैदानात उतरणार; श्रेयस अय्यर कर्णधार?
Vaibhav Suryavanshi Crying : राजस्थान हरली, वैभव सूर्यवंशी कॅमेऱ्यामागे ढसाढसा रडला... सांत्वन करायला KKRचा खेळाडू आला, नेमकं काय घडलं? Viral Video
राजस्थान हरली, वैभव सूर्यवंशी कॅमेऱ्यामागे ढसाढसा रडला... सांत्वन करायला KKRचा खेळाडू आला, नेमकं काय घडलं? Viral Video
IPL 2026 CSK vs SRH: IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG: 3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
भेंडवळच्या पाऊस, हवामान भविष्यवाणीला अंनिसचे चॅलेंज; श्याम मानव म्हणाले, 80 लाख रुपयांचे बक्षीस
भेंडवळच्या पाऊस, हवामान भविष्यवाणीला अंनिसचे चॅलेंज; श्याम मानव म्हणाले, 80 लाख रुपयांचे बक्षीस
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
Embed widget