IPL 2024: AUS, SA, WI, AFG चा एकही खेळाडू नसलेली IPL मधील एकमेव टीम; तरीही प्रतिस्पर्धी संघाला फुटतो घाम
IPL 2024: आयपीएलमधील नेमका कोणता हा संघ आहे, जाणून घ्या....
CSK Vs RCB: Latest Marathi News: 5 वेळा आयपीएल जिंकलेल्या संघात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचा एकही खेळाडू नाही यावर तुमचा विश्वास असेल का?, मात्र हे खरं आहे. आयपीएलचा सर्वात लोकप्रिय संघ चेन्नई सुपर किंग्जला या देशांतील एकाही खेळाडूची गरज भासली नाही.
चेन्नई सुपर किंग्जमधील परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक खेळाडू न्यूझीलंड संघातील आहे. सीएसकेच्या संघात एकूण 8 विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर हे 4 खेळाडू न्यूझीलंड संघाचे तर उर्वरित चार विदेशी क्रिकेटपटू श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंडचे आहेत.
न्यूझीलंडनंतर CSK संघात सर्वाधिक दोन खेळाडू श्रीलंकेचे आहेत. या संघात श्रीलंकेचा मथिशा पाथिराना आणि महीश तिक्ष्णा आहेत. याशिवाय इंग्लंडचा मोईन अली आणि बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान हे देखील चेन्नई सुपर किंग्जच्या संघात आहेत. दुसरीकडे, आयपीएलच्या उर्वरित सर्व 9 संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज किंवा अफगाणिस्तानमधील खेळाडूंचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण संघ (CSK Squad):
एमएस धोनी, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, तुषार देशपांडे, अजय मंडल, मुकेश चौधरी, राजवर्धन शेखर, राजवर्धन शेख, राजवर्धन शेख सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, अवनीश राव अरावली (सर्व भारतीय), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (न्यूझीलंड), मथिशा पाथिराना, महीश तिक्ष्णा (श्रीलंका) आणि मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश).
Matchday morning it is, #SummerOf24 is here! ☀️
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2024
GET. SET. #WhistlePodu 🥳🔥#CSKvRCB pic.twitter.com/tUY7yFxAMb
उद्घाटन समारंभाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केव्हा अन् कुठे पाहता येणार?
तुम्ही जिओ सिनेमावर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, चाहत्यांना Jio सिनेमावर 14 भाषांमध्ये आयपीएल सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या भाषेत सामने पाहता येतील. यासाठी चाहत्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही, म्हणजेच त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना जिओ सिनेमावर संपूर्ण आयपीएल विनामूल्य पाहता येणार आहे. याशिवाय टिव्हीवर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.