Budget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?
Budget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार अर्थसंकल्प कसा मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. जरी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार नसल्या तरी विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणा चालू ठेवाव्या लागणार आहेत. शिवाय जुन्या योजना सुरु ठेवत अर्थिक तूटही भरुन काढावी लागणार आहे. सोबतच खर्चाला अर्थिक शिस्तही लावावी लागणार आहे. कारण राज्यातील विकासकामे करणा-या कंत्राटदारांची जवळपास ८० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अर्थसंकल्प मांडताना मोठी आव्हानं असणार आहेत.























