IPL 2023 : आरसीबीकडून पदार्पण करणारा वैशाक आहे तरी कोण?
IPL 2023 : वानंदु हसरंगा आणि वैशाक विजय कुमार यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले.

RCB debut Vyshak Vijaykumar IPL 2023 : फाफ डु प्लेलिस याने दिल्लीविरोधात संघात दोन बदल केले. वानंदु हसरंगा आणि वैशाक विजय कुमार यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले. आरसीबीच्या संघात खेळणारा वैशाक विजय कुमार आहे तरी कोण? रजत पाटीदारच्या जागी कर्नाटकच्या वैशाक विजय कुमार याची निवड केली. आरसीबीने वैशाक विजय कुमार याला 20 लाख रुपायांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले आहे. 26 वर्षीय वैशाक कुमार कर्नाटकसाठी वेगवान गोलंदाजी करतो.
कोण आहे वैशाक विजय कुमार
वैशाक विजय कुमार याचा जन्म 31 जानेवारी 1997 रोजी कर्नाटकमध्ये झाला होता. 26 वर्षीय वैशाक विजय कुमार याची पहिल्यांदाच आयपीएलमध्ये वर्णी लागली आहे. रजत पाटीदार दुखापतग्रस्त झाल्यानंतर आरसीबीने त्याच्याजागी वैशाक याच्यासोबत करार केला. गेल्या काही दिवसांत वैशाक याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. कर्नाटक संघाकडून वैशाक याने भेदक मारा केलाय. सैय्यद मुश्ताक अली चषकात त्याने 8 टी 20 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर रणजी चषकातही त्याने भेदक गोलंदाजी केल्या. त्याने रणजीच्या 8 सामन्यात 25 च्या सरासरीने 31 विकेट घेतल्या आहे.
ನಮ್ಮ ಹುಡುಗ makes his RCB debut, and at the Chinnaswamy! 🤩
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 15, 2023
Go well, Vyshak! We know you’ll make us proud. 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvDC pic.twitter.com/Rz5iSpH0IU
Vyshak Vijaykumar makes his IPL debut! The Karnataka pacer was one of the standout performers in SMAT20 2022-23. #RCBvsDC
— Prasenjit Dey (@CricPrasen) April 15, 2023
दिल्लीने नाणेफेक जिंकली -
IPL2023 RCB vs DC : एम. चिन्नास्वामी स्टेडिअम स्टेडिअमवर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघात एक एक बदल करण्यात आला आहे. मिचेल मार्शची दिल्लीमध्ये एन्ट्री झाली आहे तर आरसीबीच्या ताफ्यात वनुंदा हसरंगा दाखल झालाय. दिल्ली संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे तर आरसीबी लागोपाठ दोन पराभवानंतर विजयी पटरीवर परतण्यासाठी मैदानात उतरले. दोन्ही संघातील ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.फ्लॉप फलंदाजी ही दिल्लीची अडचण आहे तर गोलंदाज धावा देतात ही आरसीबीची कमकुवत बाजू आहे.
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाक.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
