एक्स्प्लोर

RR vs GT Match Live Update : राजस्थानचा 37 धावांनी पराभव, गुजरातची बाजी

IPL 2022, RR vs GT Match Live Update : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल.

LIVE

Key Events
RR vs GT Match Live Update : राजस्थानचा 37 धावांनी पराभव, गुजरातची बाजी

Background

IPL 2022, RR vs GT Match Live Update : गुरुवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजतार टायन्स संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत.  तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघानेही पहिल्या चार सामन्यात तीन विजय मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

राजस्थानच्या संघाकडून फलंदाजीची धुरा जोस बटलरवर याच्यावर असणार आहे. तर शिम्रॉन हेटमायर हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार असणार  आहे. तर रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत. तर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे. तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया देखील चांगली खेळी करत आहे. सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी असे वेगवान गोलंदाज गुजरातकडे आहेत. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. दरम्यान, दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. विशेष म्हणजे या संघामध्ये चांगला समतोल असल्याचे पाहायला मिळत आहे. या संघांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे आज होणारी लढत चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डीवाय पाटील स्टेडिअमवर दोन्ही संघाची कामगिरी-
नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान संघाचा दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे. या मैदानावर राजस्थान रॉयल्सने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. मुंबईला राजस्थानने हरवले होते. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने या मैदानावर एक सामना खेळला आहे. या सामन्यात गुजरातला हैदराबादकडून पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातसाठी दिलासादायक बाब म्हणजे हार्दिक पांड्याने या मैदानावर अर्धशतकी खेळी केली होती. 

पिच रिपोर्ट
डीवाय पाटील मैदानाची खेळपट्टी फिरकीस पोषक आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबबा राहू शकतो. गुजरातच्या संघात राशिद खानसारखा दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे. तर राजस्थानच्या संघात चाहल आणि अश्विनची जोडी आहे. 

00:32 AM (IST)  •  15 Apr 2022

RR vs GT Match Live Update : राजस्थानचा 37 धावांनी पराभव, गुजरातची बाजी

RR vs GT Match Live Update : 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला. 

23:24 PM (IST)  •  14 Apr 2022

RR vs GT Match Live Update : राजस्थानला नववा धक्का, यश दयालने घेतल्या तीन विकेट

RR vs GT Match Live Update : गुजरातकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या यश दयाल याने राजस्थानला नववा धक्का दिला. यश दयाल याने चहलला बाद करत तिसरी विकेट घेतली. 

23:14 PM (IST)  •  14 Apr 2022

RR vs GT Match Live Update : गुजरातला आठवं यश, जिमी निशम बाद

RR vs GT Match Live Update : कर्णधार हार्दिक पांड्याने जिमी नीशमला बाद करत राजस्थानला आठवा धक्का दिला. नीशम 17 धावांवर बाद झाला. 

23:08 PM (IST)  •  14 Apr 2022

RR vs GT Match Live Update : राजस्थानला सातवा धक्का, रियान पराग बाद

RR vs GT Match Live Update :लॉकी फर्गुसन याने रियान परागला बाद करत गुजरातला सातवे यश मिळवून दिले. राजस्थान सात बाद 138 धावा

22:50 PM (IST)  •  14 Apr 2022

RR vs GT Match Live Update : राजस्थानला सहा धक्का, हेटमायर बाद

RR vs GT Match Live Update : मोहम्मद शामीने हेटमायरला बाद करत गुजरातला सहावे यश मिळवून दिले. हेटमायर 29 धावा काढून बाद झाला. राजस्थान सहा बाद 116 धावा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार!  पुण्यातील घटनेची A टू Z कहाणीPune Crime News :  पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP MajhaUjjwal Nikam : Dhananjay Deshmukh यांनी उपोषण थांबवावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन ABP MAJHAUjjwal Nikam on Deshmukh Case : विरोधकांच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही,उज्ज्वल निकमांनी फटकारलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Pune Crime Swargate st depot: नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Afghanistan In Champions Trophy : पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Embed widget