(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WTC Final Qualification Scenario : WTC फायनल शर्यतीतून आणखी एक संघ बाहेर, आता फक्त 4 संघांत रणसंग्राम, वाचा काय होऊ शकतं?
WTC Final 2023-25 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची शर्यत खूपच रंजक बनली आहे.
WTC Final Qualification Scenario : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची शर्यत खूपच रंजक बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने भारतीय संघाचा दावा मजबूत झाला, तर न्यूझीलंडच्या पराभवाने त्याचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपला आहे. सध्या अंतिम फेरीच्या दोन जागांसाठी चार संघांमध्ये स्पर्धा आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांचे संघ या शर्यतीत अजून आहेत.
भारताला घरच्या मैदानावर पराभूत करून 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणाऱ्या न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तीन सामन्यांच्या कसोटीतील पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाने 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे न्यूझीलंडचे स्वप्न भंगले. पहिल्या डावात 348 धावा करणाऱ्या संघाला दुसऱ्या डावात फक्त 254 धावा करता आल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्यानंतर 151 धावांची मोठी आघाडी घेतली होती. विजयासाठी यजमान संघाने केवळ 104 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लंडने चौथ्या दिवशी 2 गडी गमावून पूर्ण केले आणि दमदार विजय संपादन केला.
New Zealand's #WTC25 final chances take a big hit following their loss to England in Christchurch 👀#NZvENGhttps://t.co/REv3E3qUtC
— ICC (@ICC) December 1, 2024
न्यूझीलंडचा संघ शर्यतीतून बाहेर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला तीनपैकी तीनही सामने जिंकावे लागणार होते. पण इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना हरल्याने त्याच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा संपल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध हॅरी ब्रूकने पहिल्या डावात 171 धावा केल्या तर ब्रायडन कार्सने या सामन्यात एकूण 10 बळी घेतले.
अंतिम फेरीच्या शर्यतीत 4 संघ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या चौथ्या स्थानावर असला तरी आता तो या शर्यतीतून बाहेर पडला आहे. श्रीलंकन संघासाठी अजूनही फायनलची आशा आहे. त्याचे अजून 3 सामने बाकी आहेत आणि सर्व सामने जिंकून तो फायनलसाठी दावा ठोकू शकतो.
हे ही वाचा -