(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma Son Name Ahaan : रोहित शर्माच्या मुलाचं नाव आलं समोर, बायको रितीकानेच सांगून टाकलं; विराटच्या लेकाप्रमाणेच हटके नाव
वनडे आणि टेस्टमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा बाबा झाला.
Rohit Sharma and Ritika Sajdeh Son News : वनडे आणि टेस्टमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा बाबा झाला. 15 नोव्हेंबरला रोहितची पत्नी रितिका सजदेहने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तेव्हापासून त्याचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते, आता त्याचे नाव समोर आले आहे. रितिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये एक फोटो आहे आणि त्यातून मुलाचे नाव समोर आले आहे. रोहितच्या मुलाचे नाव अहान आहे.
रोहित शर्माच्या मुलाचे नाव जाणून घेण्याची चाहत्यांची प्रतीक्षा रविवारी (1 डिसेंबर) संपली. रोहितची पत्नी रितिका हिने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रत्येकाची टोपणनाव लिहिलेली आहे, तर त्यांच्या मुलाचे नावही अहान लिहिले आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलाचे नाव जाहीर केले.
Rohit 🤝 Ritika 🤝 Sammy 🤝 Ahaan.
— Johns. (@CricCrazyJohns) December 1, 2024
- The Christmas celebration 🤍 pic.twitter.com/2WbifiNWFl
रोहित शर्माने न्यूझीलंड मालिकेदरम्यानच सांगितले होते की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या पहिल्या कसोटीतून तो बाहेर जाऊ शकतो. तेव्हा त्याने वैयक्तिक कारणे सांगितली असली, तरी रितिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. त्यामुळेच रोहितला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता. रितिकाने 15 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला. त्यानंतर रोहित 24 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आणि 25 नोव्हेंबरला पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी तो भारतीय संघासोबत ड्रेसिंग रूममध्ये दिसला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली, तर केएल राहुलने यशस्वी जैस्वालसह दुसऱ्या सलामीवीराची जबाबदारी पार पाडली. या दोघांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आणि भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे, ज्यामध्ये रोहित कर्णधार म्हणून दिसणार आहे. मात्र, त्याच्या फलंदाजीबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. तो सलामीला येणार की खाली फलंदाजी करताना दिसणार हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -