Virat Kohli : जे भल्याभल्यांना जमलं नाही ते कोहलीने करून दाखवलं; रोहितनंतर 'विराट फॉर्म'मध्ये परतला
अहमदाबाद वनडेमध्ये अखेर विराट कोहलीने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.

Virat Kohli India Vs England : अहमदाबाद वनडेमध्ये अखेर विराट कोहलीने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. या विराट कोहलीनो 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. विराटसाठी 52 धावा हा आकडा मोठा नाही, पण खुप दिवसानंतर आल्यामुळे त्याचे महत्त्व वाढते. विराट कोहलीने अहमदाबादमध्ये 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले आणि या खेळाडूने 451 दिवसांनंतर एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले.
दुसऱ्याच षटकात विराट कोहली क्रीजवर आला. अहमदाबादमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा फक्त एक धाव करून बाद झाला. यानंतर मार्क वूडने विराट कोहलीला खूप त्रास दिला, पण या खेळाडूने संयमाने फलंदाजी केली. सेट झाल्यानंतर, विराट कोहलीने त्याचे शॉट्स खेळले. त्याने फ्लिकपासून ते कव्हर ड्राइव्हपर्यंत सर्व काही खेळले आणि त्या खेळाडूने शुभमन गिलसोबत 96 चेंडूंमध्ये शतकी भागीदारी केली. यासह, विराटने 50 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
- 119(90) in 2nd ODI at Cuttack
— MANU. (@Manojy9812) February 12, 2025
- 52(55) in 3rd ODI at Ahmedabad
- ROHIT SHARMA & VIRAT KOHLI LOOKING GOOD IN THIS ODIS SERIES VS ENGLAND AHEAD OF CHAMPIONS TROPHY 2025..!!! pic.twitter.com/PTBZiojQkW
अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहली कुठेतरी स्थिरावला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जेव्हा तो सेट होतो तेव्हा त्याच्या बॅटमधून एक मोठी खेळी येते, पण अहमदाबादमध्ये तो चुकला. आदिल रशीदच्या उत्कृष्ट लेग स्पिनमुळे विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. विराट कोहली 10 सामन्यांत पाचव्यांदा आदिल रशीदचा बळी ठरला. पण, इतक्या वाईट काळात विराटच्या बॅटमधून धावा येणे ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. विशेषतः जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे.
गेल्या 10 डावांमध्ये विराट कोहली ठरला होता अपयशी
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत पन्नासपेक्षा जास्त धावांची शेवटची खेळी खेळली, त्यानंतर पुढील 10 डावांमध्ये तो पन्नास धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. पण अहमदाबादमध्ये त्याने या अपयशाला पूर्णविराम दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याची बॅट अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे.
जे भल्याभल्यांना जमलं नाही ते कोहलीने करून दाखवलं!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. खरंतर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 16 धावांचा टप्पा गाठताच, विराट कोहलीने इंग्लिश संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या. तो इंग्लंडविरुद्ध 4000 धावा करणारा पहिला भारतीय ठरला. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याआधी, सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय होता. तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध 3990 धावा केल्या. आता विराट कोहलीने आघाडी घेतली आहे.
🚨 HISTORY BY KING KOHLI 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) February 12, 2025
- Virat Kohli becomes the first Indian to complete 4000 runs against England in International cricket 🐐 pic.twitter.com/b9bUQHRgsc
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू
4000 - विराट कोहली*
3990 - सचिन तेंडुलकर
2999 - एमएस धोनी
2993 - राहुल द्रविड
2919 - सुनील गावस्कर
2460 - रोहित शर्मा
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध 4000 धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 वेगवेगळ्या संघांविरुद्ध 4000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध हा महान पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
