Suresh Dhas Jayant Patil Jitendra Awhad :Dhananjay Munde यांचा राजीनामा, तीन नेत्यांच्या गप्पा
Suresh Dhas Jayant Patil Jitendra Awhad :Dhananjay Munde यांचा राजीनामा, तीन नेत्यांच्या गप्पा
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या घटनेचे थरकाप उडवणारे फोटो व्हायरल झाले आहेत. संतोष देशमुख यांना अंतर्वस्त्रावर बसवून आरोपींनी राक्षसी वृत्तीने मारहाण केल्याचे फोटो माध्यमातून समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर, राजकीय दबाव वाढताच मंत्री धनंजय मुंडेंनी (dhananjay munde) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही राज्यभरातून तीव्र भावना व्यक्त होत असून गेल्या अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा घ्यायला हवा होता, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. तर, मंत्री पकंजा मुंडेंनीही राजीनाम्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, धनंजयला मंत्रिपदच द्यायला नव्हते पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आता, स्वराज्य पक्षाचे संस्थापक व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर परखड भूमिका मांडली. तसेच, मंत्रिपदाचे कवच घालून तुम्ही आरोपपत्र दाखल करण्याची वाट पाहात होता का, असा सवालही संभाजीराजेंनी विचारला आहे.























