T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर 8 च्या लढती ठरल्या आहेत. बांगलादेशनं आज नेपाळला पराभूत करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

अँटिग्वा : टी 20 वर्ल्ड कप 2024 चं (T20 World Cup 2024 )आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं संयुक्तपणे केलं आहे. ग्रुप स्टेजमधील अखेरची मॅच न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यामध्ये होणार आहे. सुपर 8 मधील (Super 8 Schedule) लढतींना उद्यापासून सुरुवात होणार आहे. सुपर 8 मध्ये पहिली मॅच वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होईल. बांगलादेशनं नेपाळला पराभूत केल्यानंतर सुपर 8 मधील आठवा संघ कोणता असेल यासंदर्भातील चित्र स्पष्ट झालं आहे. बांगलादेशनं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. आता उद्यापासून सुपर 8 च्या लढतींना सुरुवात होईल.
सुपर 8 च्या लढतींचं वेळापत्रक
18 जून : अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, सकाळी 6. 00 वाजता
19 जून : अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका , रात्री 8.00 वाजता
20 जून : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज , सकाळी 6. 00 वाजता
20 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान , रात्री 8. 00 वाजता
21 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, सकाळी 6.00 वाजता
21 जून : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रात्री 8. 00 वाजता
22 जून : अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सकाळी 6.00 वाजता
22 जून : भारत विरुद्ध बांगलादेश, रात्री 8.00 वाजता
23 जून : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सकाळी 6.00 वाजता
23 जून : अमेरिका विरुद्ध इंग्लंड, रात्री 8.00 वाजता
24 जून : वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सकाळी 6.00 वाजता
24 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, रात्री 8.00 वाजता
25 जून : अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, सकाळी 6.00 वाजता
27 जून : पहिली सेमी फायनल, सकाळी 6.00 वाजता
27 जून: दुसरी सेमी फायनल , रात्री 8.00 वाजता
29 जून : अंतिम सामना , रात्री 8.00 वाजता
सुपर 8 ची दोन गटात विभागणी
ग्रुप स्टेजमधून 20 पैकी 12 संघ स्पर्धेबाहेर गेले तर पुढच्या फेरीत 8 संघांनी प्रवेश केला. आयसीसीनं या आठ संघांची दोन गटात विभागणी केली आहे. भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश या संघांचा एक गट तयार करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंडचा समावेश आहे. सुपर 8 मधून दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीच्या लढतीमधील विजेत्या संघांमध्ये अंतिम फेरीची लढत होणार आहे.
भारत 17 वर्षानंतर पुन्हा विजेतेपद मिळवणार?
भारतानं 2007 मध्ये पहिल्य टी 20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. भारताला त्यानंतर पुन्हा टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नााही. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आहे. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये तीन सामन्यात विजय मिळवला होता. आता सुपर 8 मधून सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी भारताकडे आहे.
संबंधित बातम्या :
PAK vs IRE : पाकिस्तानचा विजयासाठी संघर्ष, आयरलँँडनं अखेरपर्यंत झुंजवलं, वर्ल्ड कपमधील प्रवास संपला
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
