एक्स्प्लोर

PAK vs IRE : पाकिस्तानचा विजयासाठी संघर्ष, आयरलँँडनं अखेरपर्यंत झुंजवलं, वर्ल्ड कपमधील प्रवास संपला

PAK vs IRE : अखेर पाकिस्ताननं विजयानं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील अभियानाचा समारोप केला आहे. आयरलँड विरुद्ध पाकनं तीन विकेटनं विजय मिळवला.

फ्लोरिडा : भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर पावसाचा फटका बसल्यानं पाकिस्तानचं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्ताननं अखेरच्या मॅचमध्ये आयरलँडला तीन विकेटनं पराभूत केलं. मात्र, पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. आयरलँड पाकिस्तानला पराभूत करतं की काय अशी स्थिती एकवेळ निर्माण झाली होती. मात्र, पाकिस्ताननं कमबॅक केलं आणि विजय मिळवला. अखेर शाहीन शाह आफ्रिदीनं दोन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासाठी पाकिस्ताननं संघर्ष केला. आयरलँडनं पाकिस्तानला कडवी लढत दिली. 


आयरलँडच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी कताना 20  ओव्हरमध्ये 9 विकेटवर 106 धावा केल्या होत्या. आयरलँडला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिले. आयरलँडच्या पहिल्या पाच विकेट 28 धावांवर पडल्या होत्या. डॉकरेल, अडायर, लिटल यांच्या खेळीच्या जोरावर आयरलँडनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 106 धावांपर्यंत मजल मारली. शाहीन शाह आफ्रिदीनं तीन विकेट घेत आयरलँडला धक्के दिले. 

पाकिस्तानचा विजयासाठी संघर्ष

पाकिस्तानच्या संघानं आयरलँडला 106 धावांवर रोखल्यानंतर ते सहज विजय मिळवतील, अशी आशा पाक क्रिकेट चाहत्यांना होती. पाकिस्तान एकतर्फी वर्चस्व राखत आयरलँडला पराभूत करेल अशी आशा असताना. पाकिस्तानची टॉप ऑर्डर आज अयशस्वी ठरली. चांगली सुरुवात झाल्यानं पाकिस्ताननं 62 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. 39 ते 62 धावांच्या दरम्यान पाकिस्ताननं पाच विकेट गमावल्या. आयरलँडच्या गोलंदाजांनी धावसंख्या कमी असली तरी पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं होतं. 

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान,  एस. अयुब या दोघंनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. तर, बाबर आझमनं 32 धावा केल्या. तर, फकर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम  यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हे खेळाडू फेल ठेरले. अब्बास अफ्रिदीच्या 17 धावा आणि शाहीन शाह आफ्रिदी याच्या 13 धावांच्या जोरावर पाकिस्ताननं विजय मिळवला. 

पाकिस्तानचं आव्हान संपलं

पाकिस्तानची यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सुरुवात पराभवानं झाली. अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर भारतानं देखील पाकिस्तानच्या हातातून मॅच हिसकावून घेतली. यानंतर पाकिस्ताननं पुढच्या मॅच मध्ये कॅनडाला पराभूत केलं. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅचमध्ये अमेरिका पराभूत झाली असती पाकिस्तानला सुपर 8 चं तिकीट मिळालं असतं. मात्र,  पावसानं मॅच रद्द झाली आणि अमेरिकेचा टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवेश मात्र निश्चित झाला होता. 

संबंधित बातम्या :

T20 World Cup 2024 : सुपर 8 मध्ये आतापर्यत सात संघांचा प्रवेश, आठवा संघ भारताविरुद्ध लढणार, कुणाची वर्णी लागणार?

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT Vs MI IPL 2026 : शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
GT vs MI Score IPL 2026 : सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
Dasun Shanaka Banned PSL : पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget