एक्स्प्लोर

 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार

EPFO-UAN KYC Process: सध्या ईपीएफओ खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असल्यास एम्पलॉयच्या मंजुरीची आवश्यकता असते. येत्या काळात त्याची आवश्यकता राहणार नाही. 

EPFO News Update नवी दिल्ली : एम्पलॉय प्रॉविडेंट फंड ऑर्गनायझेशनच्या जवळपास 8 कोटी सक्रीय खातेदारांसाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओ जून 2025 पासून खातेदारांसाठी स्वंयघोषणापत्र सेवा सुरु करणार आहे. यामध्ये सेल्फ अटेस्टेशन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेणं आवश्यक राहणार नाही.  

केवायसीची प्रक्रिया सोपी होणार  

ईपीएफओच्या खातेदारांना केवायसी प्रक्रिया एकदा पूर्ण करावी लागते. ज्यामध्ये यूएएन क्रमांकासोबत केवायसी डिटेल्स लिंक केल्या जातात. सध्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीची मंजुरी आवश्यक असते. एम्पलॉयलरनं मंजुरी दिल्यानंतर केवायसी प्रक्रिया सध्या पूर्ण होते. आता ईपीएफओकडून 3.0 अंतर्गत सेल्फ अटेस्टेशन फॅसिलिट सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केवयासी प्रक्रिया पूर्ण करणं सोपं होणार आहे. नवी  प्रक्रिया सुरु झाल्यानंतर खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. काही वेळा कंपन्या बंद झाल्यानं खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नसे. त्यामुळं नव्या सुविधेमुळं कागदोपत्री प्रक्रिया कमी होईल. यामुळं ईपीएफचे क्लेम फेटाळले जातात त्याचं प्रमाण देखील कमी होईल.  

ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे. ईपीएफओ त्यांच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्णपणे सुधारणा करणार आहे. एम्पलॉयमेंट लिंक्ड स्कीम्स लागू झाल्यानंतर ईपीएफओवरील कामाचा बोजा वाढणार आहे.  तो 3.0 लाँच झाल्यानंतर कमी होणार आहे. ईएलआय लागू झाल्यानंतर ईपीएफओ खातेदारांची संख्या 10 कोटी रुपयांवर जाणार आहे. त्यामुळं आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाल्यास ईपीएफओकडून सदस्यांना चांगल्या सेवा दिल्या जाऊ शकतात.  

क्लेमशिवाय पीएफ रक्कम काढता येणार 

श्रम आणि  रोजगार मंत्रालय 2025 च्या अखेरपर्यंत ईपीएफओ 3.0 लाँच गेलं जाणार आहे. 2025-26 मध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ईपीएफओ 3.0 मध्ये बँकांसोबत मिळून एक सुविधा तयार करण्याबाबत विचार केला जात आहे. ज्यामध्ये ईपीएफ सबस्क्रायबर्स एका मर्यादेपर्यंत त्यांच्या कॉरपसमधून फंड काढू शकतात. साधारणपणे ती 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यासाठी ईपीएफओकडे क्लेम करण्याची आवश्यकता नसेल. श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी ईपीएफओ असा एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यावरुन कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय पीएफ खात्यातून रक्कम काढू शकतील, असं ते म्हणाले. 

इतर बातम्या : 

डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Embed widget