एक्स्प्लोर

Richest Cricketer in the World : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण? कोणाची संपत्ती किती?

Richest Cricketer in the World : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये किती भारतीयांचा समावेश आहे? जाणून घेऊयात...

Richest Cricketer in the World : भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी भारतीयांचा आवडता खेळ क्रिकेटचं आहे, हे सर्वश्रुत आहे. भारतीय क्रिकेटप्रमाणे आपल्या आवडत्या खेळाडूंवर प्रचंड प्रेम करत असतात. मैदानावर असो की स्टेडियम बाहेर लोक आपल्या आवडत्या खेळाडूविषयी प्रेम व्यक्त करत असतात. दरम्यान, कोट्यावधी चाहते असलेल्या क्रिकेट खेळाडूंमध्ये कोणाची संपत्ती सर्वात जास्त आहे? कोण जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे ? जाणून घेऊयात...

सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर 

भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. सचिनने जवळपास 10 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, अजूनही श्रीमंतीच्या बाबतीत तो टॉपवर आहे. सचिन तेंडुलकरची संपत्ती जवळपास 1250 कोटी रुपयांची आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिन समालोचन आणि जाहिरातींमध्ये काम करताना दिसला आहे.  

कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची संपत्ती किती? 

सचिननंतर या यादीत दुसरं नाव आहे. कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचं...मिडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंग धोनीची संपत्ती जवळपास 1040 कोटी रुपयांची आहे. भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार म्हणून धोनी भारतात कमालीचा लोकप्रिय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलमधून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. जाहिरातीमधूनही धोनी पैसे कमावतो. 

सचिन तेंडुलकर आणि मेहेंद्रसिंग धोनीनंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीची संपत्ती जवळपास 1020 कोटी रुपयांची आहे. 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा विराटही संघाचा भाग होता. त्यानंतर नुकताच 2023 मध्ये भारताने टी 20 विश्वचषक जिंकलाय. या वर्ल्डकपमध्ये विराटने महत्वाची भूमिका बजावली होती. 

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीमध्ये चौथ्या क्रमाकांवर आहे. सौरव गांगुलीची संपत्ती 634 कोटी संपत्ती आहे. त्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या यादीत टॉप 4 मध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी सौरव गांगुली यांच्यावर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी होती. 

रिकी पॉटिंगची संपत्ती किती? 

श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर विदेशी खेळाडूचे नाव आहे. ऑस्ट्रेलियाला अनेकदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पॉटिंगची संपत्ती 480 कोटी रुपयांची आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला गोलंदाजी, फलंदाजी आणि श्रेत्ररक्षण, या तिन्ही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी पॉटिंगने सर्वोतोपरी प्रयत्न केले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG Semi Final LIVE Update 2026 : सॅमसन नावाचं वादळ अन् इंग्रजांची दाणादाण; टीम इंडियाने इंग्लंडसमोर ठेवले 254 धावांचं लक्ष्य
सॅमसन नावाचं वादळ अन् इंग्रजांची दाणादाण; टीम इंडियाने इंग्लंडसमोर ठेवले 254 धावांचं लक्ष्य
Sanju Samson IND vs ENG Semi Final : 7 षटकार, 8 चौकार.... वानखेडेवर सॅमसनचा हिट 'शो'! भारतीय प्रेक्षकांना गप्प करू म्हणाऱ्या इंग्रजांची बोलती बंद; हॅरी ब्रूकच्या चेहऱ्याचा रंग उडाला
7 षटकार, 8 चौकार.... वानखेडेवर सॅमसनचा हिट 'शो'! भारतीय प्रेक्षकांना गप्प करू म्हणाऱ्या इंग्रजांची बोलती बंद; हॅरी ब्रूकच्या चेहऱ्याचा रंग उडाला
Abhishek Sharma IND vs ENG Semi Final : संजूचा लाख मोलाचा सल्ला धुडकावला, अभिषेक शर्मानं इंग्रजांना हवं तेच केलं, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
संजूचा लाख मोलाचा सल्ला धुडकावला, अभिषेक शर्मानं इंग्रजांना हवं तेच केलं, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
IND vs ENG T20 World Cup Semi Final : आम्हाला आधी बॅटिंगच हवी होती...; सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर कर्णधार सूर्या काय म्हणाला?, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
आम्हाला आधी बॅटिंगच हवी होती...; सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर कर्णधार सूर्या काय म्हणाला?, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Embed widget