MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात अनुभवी खेळाडूंनी भरलेल्या मुंबई संघाने शरणागती पत्करलेली.
Mumbai Vs Jammu And Kashmir Ranji Trophy 2024-25 Match : रणजी ट्रॉफी 2024-25 च्या या हंगामात जम्मू आणि काश्मीर विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात अनुभवी खेळाडूंनी भरलेल्या मुंबई संघाने शरणागती पत्करलेली. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मात्र अर्धशतक झळकावले, ज्यामुळे मुंबईचा धावसंख्या 100 च्या पुढे गेली. जर शार्दुलने ही खेळी खेळली नसती तर मुंबईची अवस्था आणखी वाईट झाली असती.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु या संघाचे स्टार फलंदाज जम्मू आणि काश्मीरच्या गोलंदाजांसमोर काही खास करू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 120 धावांवर गारद झाला. जम्मू आणि काश्मीरचे गोलंदाज उमर नझीर आणि युद्धवीर सिंग यांनी मुंबईला इतक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात मोठी भूमिका बजावली.
A STAR PACKED MUMBAI BATTING ALL-OUT FOR 120 RUNS 🤯
— Johns. (@CricCrazyJohns) January 23, 2025
- Remember Mumbai is the current Champions of Ranji Trophy. pic.twitter.com/64ZpQAboiE
शार्दुलने ठोकले अर्धशतक, मुंबईचे स्टार खेळाडू ठरले अपयशी
जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी केली, त्याने 57 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या आणि तो या संघाचा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाजही ठरला. याशिवाय, तनुष कोटियनने शेवटच्या क्षणी 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि त्याच्या फलंदाजीमुळे मुंबईची धावसंख्या 120 धावांपर्यंत पोहोचली. या सामन्यात रोहित शर्मा 3 धावांवर तर यशस्वी जैस्वाल 4 धावा करून आऊट झाला.
THE CRISIS MAN - LORD THAKUR 🙇
— Johns. (@CricCrazyJohns) January 23, 2025
- Long injury break, dropped from Indian setup, no IPL contract but he is grinding hard in domestics. pic.twitter.com/AFeS5W9YMr
मुंबईकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक तामोरेने पहिल्या डावात 7 धावा केल्या तर कर्णधार अजिंक्य रहाणेने 12 धावा आणि श्रेयस अय्यरने 11 धावा केल्या. पहिल्या डावात शिवम दुबे आपले खातेही उघडू शकले नाहीत आणि शून्यावर बाद झाले, तर शम्स मुलानी आणि मोहित अवस्थी देखील शून्यावर बाद झाले.
उमर नझीर आणि युद्धवीर सिंग जोडीचा कहर!
मुंबईविरुद्धच्या पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरचा 6 फूट 4 इंचाचा वेगवान गोलंदाज उमर नझीरने 11 षटकांत 41 धावा देत 4 खेळाडूंची शिकार केली. तर युद्धवीर सिंगने 8.2 षटकांत 31 धावा देत 4 विकेट घेतल्या. पहिल्या डावात आकिब नाबिदारला 2 यश मिळाले. उमर नझीरने रोहित, हार्दिक, रहाणे आणि शिवम यांचे बळी घेतले तर युद्धवीरने श्रेयस, शम्स मुलानी, शार्दुल आणि मोहित अवस्थीला आऊट केले. पहिल्या डावात आकिबने यशस्वी जैस्वाल आणि तनुश कोटियन यांना बाद केले.
हे ही वाचा -