Ranji Trophy Rishabh Pant : रणजी ट्रॉफीला हलक्यात घेणे पंतला पडले महागात, आदल्या दिवसाची मस्ती नडली, पाहा VIDEO
भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्मच्या शोधात आहे. यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.
Ranji Trophy Rishabh Pant : भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्मच्या शोधात आहे. यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण, जवळजवळ 10 वर्षांनी रणजीमध्ये परतल्यानंतरही तो अपयशी ठरला. जवळपास एक दशकानंतर रणजी ट्रॉफी सामना खेळणारा रोहित मुंबईच्या जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात फक्त तीन धावा करून बाद झाला.
फक्त रोहितच नाही तर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांचेही बॅट शांत राहिले. दुसरीकडे, पंजाब आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात शुभमन गिल आणि दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात ऋषभ पंत हे देखील अपयशी ठरले.
शुभमन गिल पण ठरला फेल, रवींद्र जडेजाचा मात्र धमाका!
ऋषभ पंत दिल्ली संघाचा भाग आहे आणि गिल पंजाब संघाचा भाग आहे. कर्नाटक विरुद्ध पंजाबच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल फक्त चार धावा करून बाद झाला. त्याने आठ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारला. तर, दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पंत फक्त एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचाही भाग आहे. पंतला 10 चेंडूत एक धाव काढता आली. धर्मेंद्र सिंग जडेजाच्या चेंडूवर प्रेराक मंकडने त्याचा झेल टिपला. पण, सौराष्ट्र संघातील रवींद्र जडेजा या सामन्यात निश्चितच चमकला आणि त्याने आतापर्यंत दिल्लीच्या दोन विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाने सनत सांगवान आणि यश धुल यांना बाद केले.
Karma is a boomerang! Yesterday, Pant fans were trolling Sanju Samson despite his great performance, saying Pant is better. Today, Pant gets out for 1 run in a Ranji Trophy match! Irony at its best 🤣#Karma #RishabhPant #SanjuSamson pic.twitter.com/PvSG4EZcYw
— Mahi Patel (@Mahi_Patel_07) January 23, 2025
ऋषभ पंतला आदल्या दिवसाची मस्ती नडली?
रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने फलंदाजी करताना सुपर फ्लॉप कामगिरी केली. दिल्ली संघाकडून खेळताना, सौराष्ट्राविरुद्ध फक्त 1 धाव केल्यानंतर पंत बाद झाला. रणजी सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी, त्याने एक रील व्हिडिओ शेअर केला होता. या रील व्हिडिओमध्ये, पंत त्याच्या सहकारी खेळाडूंसोबत हसताना आणि मस्ती करताना दिसला. त्यामुळे चाहते म्हणत आहे की, रणजी ट्रॉफीला हलक्यात घेणे पंतला महागात पडले आहे, सामन्याआधी मस्ती सोडून त्याने जरा सराव करायला पाहिजे होता.
View this post on Instagram
हे ही वाचा -