एक्स्प्लोर

Ira Jadhav Triple Century Record : 42 चौकार, 16 षटकार अन् 346 धावा... 14 वर्षाच्या इरा जाधवचा धमाका! आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

मुंबईची 14 वर्षीय खेळाडू इरा जाधवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

Mumbai 14 Year Old Player Slams Triple Century In Under-19 Level : मुंबईची 14 वर्षीय खेळाडू इरा जाधवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत धमाकेदार त्रिशतक झळकावले. यासह, ती 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. आजपर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला एवढी मोठी धावसंख्या करता आली नव्हती, पण इरा जाधवने इतिहास रचला आहे.

इरा जाधवने 157 चेंडूत केल्या 346 धावा

जर आपण इराबद्दल बोललो तर, ती फक्त १४ वर्षांची आहे. आगामी 19 वर्षांखालील महिला वर्ल्ड कप 18 जानेवारी 2025 रोजी मलेशियामध्ये सुरू होणार आहे. ज्यासाठी तिचा स्टँडबाय खेळाडूंमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. रविवारी बंगळुरूमध्ये मेघालयविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इराने शानदार त्रिशतक झळकावून विक्रमी कामगिरी केली. 

महिला अंडर-१९ एकदिवसीय कप सामन्यात शानदार खेळी करत इराने हा मोठा विक्रम केला. तिने फक्त 157 चेंडूत 346 धावांची जबरदस्त स्फोटक खेळी केली. यादरम्यान इराने 42 चौकार आणि 16 षटकार मारले. तर दुसरीकडे मुंबईची कर्णधार हर्ले गालाने 79 चेंडूत 116 धावांची खेळीही केली. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी एकूण 17 षटकार आणि 63 चौकार मारले आणि त्यामुळे संघाने 563 धावा केल्या.  

आतापर्यंत, फक्त चार भारतीय महिला फलंदाजांनी अंडर-19 एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये 2013 मध्ये 224 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या दिग्गज फलंदाज स्मृती मानधना हिचेही नाव आहे. याशिवाय राघवी बिश्त हिने नाबाद 219 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने पण नाबाद 202 आणि सानिका चालकेने 200 धावा केल्या. पण आता इरा जाधवने हे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

WPL लिलाव अनसोल्ड

इरा जाधवने डिसेंबरमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) लिलाव 2025 च्या लिलावात नाव नोंदवले होते. पण त्यावेळी कोणीही तिला खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती, पण ती अनसोल्ड राहिली. आता त्याने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे. आता तिला 19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे बाकी आहे.

Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 25 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : दुसऱ्या दरवाजाने कोरटकर कोर्टात, शिवप्रेमी संतप्त, पायताण देऊन घोषणाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Embed widget