Ind vs Eng 1st ODI : नागपुरात फिरंगी चितपट! टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावाला धुमधडक्यात सुरू, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
India vs England 1st ODI Live Score Update : मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
LIVE

Background
Ind vs Eng 1st ODI : नागपुरात फिरंगी चितपट! टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना चार विकेट्सने जिंकला आहे. यासह, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गुरुवारी नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 47.4 षटकांत 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने 38.4 षटकांत सहा गडी गमावून 251 धावा केल्या आणि सामना जिंकला. आता, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ अजिंक्य आघाडी मिळविण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाईल.
Fifties from Shubman Gill, Shreyas Iyer and Axar Patel do the job for India in the first ODI 🙌#INDvENG 📝: https://t.co/O3Pk2D1qSL pic.twitter.com/IfGkdruRDb
— ICC (@ICC) February 6, 2025
Ind vs Eng 1st ODI Live Score : शुभमन गिलचे शतक हुकले! हार्दिक पांड्याने खेळ केला खराब, टीम इंडियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
शुभमन गिल 87 धावा करून आऊट झाला आहे. त्याला साकिब महमूदने आऊट केले. रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. हार्दिक पांड्या त्याला पाठिंबा देण्यासाठी क्रीजवर उपस्थित आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे.
केएल राहुल दोन धावा करून आऊट
केएल राहुलच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला आहे. त्याला पण आदिल रशीदने आऊट केले. या सामन्यात त्याला फक्त दोन धावा करता आल्या.
Ind vs Eng 1st ODI Live Score : 52 धावांची दमदार खेळीनंतर अक्षर पटेल परतला पॅव्हेलियनमध्ये, टीम इंडियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
भारतीय संघाला अक्षर पटेलच्या रूपाने चौथा धक्का बसला. त्याला आदिल रशीदने आऊट केले. 52 धावांची दमदार खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
Ind vs Eng 1st ODI Live Score : टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल; गिलनंतर, अक्षरने ठोकले अर्धशतक
श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यानंतर अक्षर पटेलनेही अर्धशतक झळकावले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक फक्त 46 चेंडूत पूर्ण केले. भारत आता विजयाच्या अगदी जवळ आहे. शुभमन गिल 80 धावा करून सध्या क्रीजवर आहे. दोघांमध्ये 100+ धावांची भागीदारी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
