एक्स्प्लोर

India VS Ireland, 1st T20 Cricket Match : आयर्लंड दौऱ्यासाठी महाराष्ट्राचे दोन शिलेदार; ऋतुराज गायकवाडसोबत 'या' खेळाडूचा टीम इंडियात समावेश!

India VS Ireland, 1st T20 Cricket Match: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात महाराष्ट्राच्या दोन शिलेदारांचा समावेश. एक ऋतुराज गायकवाड, तर दुसरा...

IND vs IRE, 1st T20: आज टीम इंडिया (Team India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यात पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात अनेक नवख्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या संघात महाराष्ट्राचा मराठमोळा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड खेळताना दिसणार आहे. पण, ऋतुराज गायकवाडसोबतच आणखी एक महाराष्ट्राचा शिलेदार खेळताना दिसणार आहे. आपल्या दमदार खेळीनं आयपीएल गाजवणारा जितेश शर्मा आजच्या सामन्यातून आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पदार्पण करणार आहे. जितेश शर्मा मुळचा अमरावतीचा. आयपीएलपूर्वी जितेशनं भारतामधील काही स्थानिक स्पर्धांमध्येही मैदान मारलं होतं.  

जितेश शर्मा टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर पहिल्यांदाच जितेश शर्माला टीम इंडियात संधी मिळाली आहे. जितेशच्या जमेच्या बाजूबाबत बोलायचं तर जितेश उत्तम विकेटकिपींगसोबत जबरदस्त फिनिशिंगचीही भूमिका बजावू शकतो. 

कोण आहे जितेश शर्मा? 

जितेश शर्माचा जन्म 22 ऑक्टोबर 1993 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील आहे. देशांतर्गत क्रिकेटपटू खेळाडू आहे. त्याने 2014 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 29 वर्षीय जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रामुख्याने विदर्भ संघासाठी खेळतो. सध्या आयपीएल 2023 मध्ये तो पंजाब संघाचा भाग आहे. विदर्भातील यष्टीरक्षक आणि फलंदाज जितेश शर्माने 54 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 141.83 च्या स्ट्राइक रेटने 1329 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्स संघाने 20 लाख रुपयांना विकत घेतलं. यापूर्वी, जानेवारी 2023 मध्ये जितेश शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या टी20I संघात जखमी संजू सॅमसनची जागा घेतली होती. 

बुमराहवर खिळल्यात सर्वांच्या नजरा 

टीम इंडिया आणि आयर्लंड  यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज, 18 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता डब्लिन येथे खेळवला जाईल. आयर्लंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या नव्या खेळाडूंचं नशीब उघडू शकतं. आजच्या सामन्यातून संघ व्यवस्थापनानं काही नव्या खेळाडूंचं पदार्पण करण्याची योजना तयार केली आहे. जवळपास 11 महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह आजपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. कित्येत महिन्यांनी बुमराहला मैदानात खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. 

पहिल्या टी20 मध्ये 'या' खेळाडूंचं नशीब उजळणार 

भारतीय क्रिकेट संघात आयपीएल स्टार ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा आहेत. पण सर्वांच्या नजरा बुमराहवरच असतील. दोन महिन्यांनंतर टीम इंडियात सुरू होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हा वेगवान गोलंदाज भारताच्या रणनीतीचा अविभाज्य भाग आहे. 29 वर्षीय बुमराहला गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत कंबरेला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून बुमराह मैदानापासून दूर होता. आता तो संघात पुनरागमन करणार आहे. 

टीम इंडियाचा नवख्या खेळाडूंच्या डेब्यूचा प्लान

त्याला पाच दिवसांत तीन सामन्यांत जास्तीत जास्त 12 ओव्हर्स टाकावे लागतील. या सीरिजमधून मुख्य सिलेक्टर अजित आगरकर, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मॅच फिटनेसच्या बाबतीत बुमराहचा फॉर्म काय आहे, हे समजण्यास मदत होणार आहे. दरम्यान, 50 ओव्हर्सचं स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे. कारण त्याला दोन, तीन किंवा चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये दहा षटकं टाकावी लागतील.

आयर्लंड सीरिजसाठी टीम इंडिया 

जसप्रीत बुमराह (कर्णधार), रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, शाहबाज अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?Eknath Shinde Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने, बैठकीत काय घडलं?Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Embed widget