Ind vs Ban Dubai Update : रोहित टेन्शनमध्ये! भारत-बांगलादेश सामन्यावर संकट, टीम इंडियाचा सगळा प्लॅन धुळीस मिळणार?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे झाली.

Bangladesh vs India, 2nd Match Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने आले. आता भारतीय संघ 20 फेब्रुवारीपासून दुबईमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताने नेटमध्ये घाम गाळला, पण या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. जर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर, भारताला आपला प्लॅन बदलावा लागू शकतो.
भारत फिरकी गोलंदाजांवर अवलंबून
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघात 5 फिरकीपटू आहेत, त्यापैकी तीन फिरकीपटूंसह टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध खेळू शकते. पण भारताला हा प्लॅन बदलावा लागू शकतो, कारण दुबई शहरात पाऊस पडत आहे. येथे अनेकदा कृत्रिम पाऊसही पाडला जातो. 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
18 फेब्रुवारीला झाला मुसळधार पाऊस
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एक दिवस आधी 18 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडला. त्याच वेळी, 20 फेब्रुवारीबाबत हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट दिसून येत आहे. इथेही पाऊस सामन्याचा खेळ खराब करू शकतो. पण, 20 फेब्रुवारी रोजी अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारताचा वरचष्मा
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. पण, बांगलादेश संघाने घरच्या मैदानावर झालेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा पराभव केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी नेटमध्ये चमकदार कामगिरी केली. कोहली आणि रोहितसह खेळाडूंनी घाम गाळला.
टीम इंडियाचे कॉम्बिनेशन
भारत मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगच्या रूपात दोन वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो, तर हार्दिक तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावेल. भारतीय संघ 3 फिरकी गोलंदाज आणि 3 वेगवान गोलंदाजांचे कॉम्बिनेशन असू शकते. भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होणार आहेत, जिथे गोलंदाजीमध्ये अधिक पर्याय टीम इंडियासाठी प्रभावी ठरू शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
हे ही वाचा -
Video : 270 किलो वजन अन् एका सेकंदाची चूक, गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरचा क्षणात अंत; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
