6,1,6,6,6 शेवटच्या दोन ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस, 11 बॉलमध्ये 66 धावा, फलंदाजांनी विजय खेचून आणला, पाहा व्हिडीओ
Cricket News :क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत मॅच कुणाकडे जाईल,कोण विजय मिळवेल आणि कोण पराभूत होईल हे सांगता येत नाही.
नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हेनरिक क्लासेन फलंदाजी करत असताना कोट्यवधी भारतीयांना मॅच हातून निसटली असं वाटत होतं. हेनरिक क्लासेननं अक्षर पटेलच्या एका ओव्हरमध्ये मॅच दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकवली होती. पुढच्या पाच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 30 धावांची गरज होती. पुढच्या पाच ओव्हरमध्ये भारताच्या गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली.क्रिकेट मॅचमध्ये कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. यूरोपियन क्रिकेट इंटरनॅशनल टी 10 स्पर्धेत अशीच स्थिती निर्माण झाली होती. रोमानिया आणि ऑस्ट्रिया यांच्यातील मॅचमध्ये शेवटच्या दोन ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. ऑस्ट्रियाला रोमानियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 61 धावांची गरज होती. रोमानियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना दोन विकेटवर 167 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रियानं 8 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 107 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रियाचा कॅप्टन आकिब इकबाल 9 बॉलवर 22 धावांवर होता, तर इमरान आसिफ 9 बॉलवर 14 धावांवर होता. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रियाला 61 धावा हव्या होत्या. या धावा ऑस्ट्रियाला काढता येतील, असं कुणाला देखील वाटलं नसेल. अशक्यप्राय अशी कामगिरी ऑस्ट्रियाच्या फलंदाजांनी करुन दाखवली.
रोमानियाकडून मनमीत कोली नवव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. ऑस्ट्रियानं नवव्या ओव्हरमध्ये 41 धावा दिल्या अन् मॅच फिरली. नवव्या ओव्हरमध्ये कोलीनं सहा ऐवजी एकूण 10 बॉल टाकले. नो, वाईड अन् एक्स्ट्रा आणि चौकार षटकार मिळून ऑस्ट्रियानं 41 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ :
Austria chase 6️⃣1️⃣ runs in last 2 overs! 🤯#EuropeanCricket #EuropeanCricketInternational #StrongerTogether pic.twitter.com/Y8bLptmT56
— European Cricket (@EuropeanCricket) July 15, 2024
मनमीत कोलीनं टाकलेल्या बॉलवर इमरान आसिफनं एक रन काढली. पुढचा बॉल कोलीनं वाईड टाकला. यावर आणखी चार धावा ऑस्ट्रियाला मिळाल्या. पुढच्या बॉलवर आकिब इकबाल स्ट्राईकवर होता. त्यानं षटकार मारला.त्यानंतर चौकार, पुन्हा षटकार इकबालनं मारला. यानंतर कोलीनं पुढचा बॉल नो टाकला, यावर देखील षटकार मारला गेला.यानंतर एक बॉल डॉट गेला. कोलीनं पुढचा बॉल नो टाकला, त्यावर ऑस्ट्रियाच्या फलंदाजानं षटकार मारला. यानंतर वाईड बॉल गेला. अखेरच्या बॉल ऑस्ट्रियाला चौकार मिळाला.ऑस्ट्रियानं नवव्या ओव्हरमध्ये 41 धावा मिळवल्या. त्यामुळं ऑस्ट्रियाची धावसंख्या 9 ओव्हरनंतर 148 वर पोहोचली.
यानंतर रोमानियानं शेवटची ओव्हर चमकला फर्नांडोला दिली. रोमानियाला पराभवापासून तो देखील वाचवू शकला नाही.त्यानं देखील पुढच्या 5 बॉलमध्ये 25 धावा दिल्या. ऑस्ट्रियानं एक बॉल राखून विजय मिळवला. फर्नांडोला ऑस्ट्रियाच्या फलंदाजांनी 6,1,6,6,6 काढल्या अन् विजय मिळवला.
इतर बातम्या :