(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 3-0 नं नमवलं
Commonwealth Games 2022 Table Tennis: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची चांगली सुरुवात झालीय.
Commonwealth Games 2022 Table Tennis: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन (Reeth Tennison) आणि श्रीजा अकुलानं (Sreeja Akula) दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स (Lailaa Edwards) आणि दानिशा पटेलला (Danisha Patel) पराभूत करत कॉमनवेल्थ मोहिमेची सुरुवात केली.
महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत श्रीजा अकुला आणि रीथ टेनिसननं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिशा पटेल या जोडीचा 3-0 (11-7, 11-7, 11-5) असा पराभव केलाय. महिला संघाचा पुढील सामना रात्री 8.30 वाजता फिजीशी होईल. दरम्यान, पुरूष संघाचा सामना बार्बाडोसविरुद्ध संध्याकाळी 4.30 वाजता होईल.
15 खेळांमध्ये सहभागी होतील भारतीय खेळाडू
भारतीय खेळाडू 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतलाय. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडलं आहे. भारतीय सदस्य येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी आहे.
ऑलिम्पिक पदकविजेते भारतीय सदस्यांचा भाग
कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया, मनिका बत्रा, विनेश फोगट, हिमा दास आणि अमित पंघल हे देखील या संघात आहेत. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना भारतीय संघाचे संघप्रमुख बनवण्यात आलंय.
हे देखील वाचा-
- CWG 2022: ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
- IND vs WI, 1st T20, Pitch Report : भारत-वेस्ट इंडीज टी20 मालिकेतील आज पहिला सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?
- Rohit Sharma: वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना धुण्यासाठी हिटमॅन सज्ज, नेटमध्ये पाडतोय चौकार- षटकारांचा पाऊस! पाहा व्हिडिओ