(Source: Poll of Polls)
CWG 2022: ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
कॉमनवेल्थ स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा 2022, भारतीय महिला संघ, ऑस्ट्रेलिया महिला संघ, हरमनप्रीत कौर,
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिला क्रिकेटचा सामना भारत महिला संघ (Indian Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (Australia Women) यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असेल. टीम इंडियासाठी या सामन्यात स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मासह (Deepti Sharma) अनेक खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मागील पाच टी-20 सामन्यावर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाचं पारडं जडं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या मागील पाच टी-20 सामन्यात भारताला चार वेळा पराभव स्वीकारावा लागलाय. तर, फक्त एका सामन्यात यश मिळवलंय. या पाच सामन्यांमध्ये मार्च 2020 मध्ये खेळला गेलेला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना देखील आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 184 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतचा संपूर्ण संघ 99 धावा करून सर्वबाद झाला होता.
भारताचा प्लेईंग इलेव्हन:
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंह.
ऑस्ट्रेलियाचा प्लेईंग इलेव्हन:
अॅलिसा हिली (विकेटकिपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन.
भारतीय क्रिकेट संघाचं संपूर्ण वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)
तारीख | सामने | ठिकाण | वेळ |
29 जुले 2022 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 11:00 am– 2:30 pm |
31 जुले 2022 | भारत विरुद्ध पाकिस्तान | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 11:00 am– 2:30 pm |
03 ऑगस्ट 2022 | भारत विरुद्ध बारबाडोस | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 6:00 pm – 9:30 pm |
06 ऑगस्ट 2022 | उपांत्य फेरी 1 | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 11:00 am– 2:30 pm |
06 ऑगस्ट 2022 | उपांत्य फेरी 2 | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 6:00 pm – 9:30 pm |
07 ऑगस्ट 2022 | कांस्यपदक सामना | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 10:00 am– 1:30 pm |
07 ऑगस्ट 2022 | सुवर्णपदक सामना | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम | 5:00 pm – 8:30 pm |
हे देखील वाचा-