एक्स्प्लोर
Advertisement

Vinesh Phogat Birthday : आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड मिळवणारी विनेश फोगाट, आता WFIकडून निलंबित

vinesh phogat,
1/8

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटचा आज वाढदिवस आहे. कुस्ती खेळणाऱ्या फोगाट भगिनींच्यापैकी ती एक आहे. (photo courtesy: Vinesh Phogat/IG)
2/8

तिने 2018 साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. (photo courtesy: Vinesh Phogat/IG)
3/8

आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली(photo courtesy: Vinesh Phogat/IG)
4/8

2020 मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(photo courtesy: Vinesh Phogat/IG)
5/8

विनेश ही महावीर सिंग फोगट यांची पुतणी असून महावीर फोगट यांच्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी फोगट तसेच रितू फोगट या सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत.(photo courtesy: Vinesh Phogat/IG)
6/8

कुस्तीपटू विनेश फोगटवर टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तभंगाचा आरोप होता.(photo courtesy: Vinesh Phogat/IG)
7/8

यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) विनेशला तात्पुरते निलंबित केले आहे. (photo courtesy: Vinesh Phogat/IG)
8/8

क्रीडा क्षेत्रातील अनुशासनाबद्दल कुस्तीपटू विनेशवर महासंघ नाराज आहे. फोगटने स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि भारतीय संघातील इतर सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला होता. मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्याशीही तिचा वाद झाला होता.(photo courtesy: Vinesh Phogat/IG)
Published at : 25 Aug 2021 10:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
