Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Yogi Adityanath In Kolhapur : आदित्यनाथ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
Yogi Adityanath In Kolhapur : ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही निती आणि नैतिकता नसलेली आघाडी आहे. महाविकास आघाडीत नुरा कुस्ती चालू आहे. पवार आणि ठाकरेंमध्ये नुरा कुस्ती सुरू असून ते स्वत:ला आणि देशाला धोका देतील, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. आदित्यनाथ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभा झाली. यावेळी बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मल्लिकार्जुन खरगे यांचं घर निजामानी जाळलं होतं
योगी म्हणाले की, काँग्रेसचा इतिहासच देशाला धोका देण्याचा आहे. काँग्रेस नसता तर हा देश कधी तुटला नसता, देश तुटला नसता तर आज पाकिस्तान नसता. काँग्रेसच्या गुदगुल्याने आज पाकिस्तान आहे. ते म्हणाले की, काल प्रियांका वढेरा आल्या होत्या त्यांनी विकासावर काही बोललं नसणार, त्या केवळ तोडण्याची भाषा करण्यासाठी आल्या होत्या. ते म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे यांचं घर निजामानी जाळलं होतं. यात खरगे यांचे कुटुंब जाळल होतं. मी ज्यावेळी बटेंगे तो कंटेंगे म्हटल्यावर खर्गे यांना राग येतो. खर्गे जी लोकांना खरा इतिहास सांगा निजाम कोण होता असे योगी म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधी काँग्रेसबरोबर आघाडी केली असती का?
योगी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधी काँग्रेस बरोबर आघाडी केली असती का? पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या मूल्यांना बाजूला करून काँग्रेसबरोबर आघाडी केली. महायुती सरकार आलं की विशाळगड अतिक्रमण आपोआप निघतं. आपल्या गणेश मिरवणुकीवर कोण दगडफेक करणार नाही. त्यांना माहीत आहे जर दगडफेक केली तर उत्तर प्रदेशचा फॉर्म्युला इथं लागू होईल, असे योगी म्हणाले.
काँग्रेससाठी कधी देश महत्वाचा वाटला नाही
योगी यांनी सांगितले की, काँग्रेससाठी कधी देश महत्वाचा वाटला नाही. युपीए सरकारच्या काळात दहशत वाढला होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कुणी देशाकडे वाकड्या नजरेने पाहत नाहीत. हा नवीन भारत आहे कुणी छेडलं तर सोडत नाही. हम बटे थे तब अपमान सहन करना पडता था! अयोध्यामध्ये काँग्रेस देखील राम मंदिर बांधू शकलं असतं पण त्यांनी बांधलं नाही, अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या